थोर कल्याणकारी राजाला अभिवादन करीत जिल्ह्यात सामाजिक न्याय दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 26 June 2020

थोर कल्याणकारी राजाला अभिवादन करीत जिल्ह्यात सामाजिक न्याय दिन साजरा

नांदेड दि. 26 :- सामाजिक न्यायासाठी कृतिशील आग्रह धरत आपल्या जीवनकार्यातून संदेश देणारे थोर कल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा  जन्मदिवस आज “सामाजिक न्याय दिन” म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात आला.

नांदेड शहरातील कृषि महाविद्यालयाजवळ असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास नागरिकांनी भेट देवून पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. जिल्ह्यात विविध कार्यालयातील अधीकारी कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी सामाजिक अंतर राखून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Pages