किनवट,दि.२६: तालुक्यातील सात मंडळापैकी किनवट, ईस्लापूर, मांडवी व बोधडी या चार मंडळांमध्ये गुरुवारी (दि.२५) हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.शुक्रवारी (दि.२६) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकूण२१ मि.मी., तर सरासरीत ३ मी.मी.पाऊस झाला.
तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस असा;(कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये)
किनवट- ५(६४)मि.मी;ईस्लापूर- ४(१५५)मि.मी.;मांडवी - २
(१२१)मि.मी.;बोधडी- १०(४७)मि.मी; दहेली-००(२२८)मि.मी.;जलधरा- ००(७३)मि.मी.;शिवणी-००(९४)मि.मी.तालुक्यात आज ६.५७,तर आजपर्यंत १११.५७ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक पाऊस दहेली मंडळात झाला आहे.बहुसंख्य शेतक-यांनी पिकांच्या लागवडी केलेल्या आहेत,परंतु,आता मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
Friday, 26 June 2020
तालुक्यात गुरुवारी चार मंडळात हलका पाऊस; जोरदार पावसाची अजुनही प्रतीक्षाच
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment