एक महिन्यापासून आदिलाबादला वास्तव्यास असलेले किनवटचे तिघे पॉझिटिव्ह ; जनतेंनी घाबरून जाऊ नये -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 26 June 2020

एक महिन्यापासून आदिलाबादला वास्तव्यास असलेले किनवटचे तिघे पॉझिटिव्ह ; जनतेंनी घाबरून जाऊ नये -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

किनवट दि 26 ( तालुका प्रतिनिधी ) : आदिलाबाद येथे निघालेल्या तीन पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये किनवटचे तिघे जण असल्याचे समजते. ते मागील एक महिन्यापासून आदिलाबाद येथे वास्तव्यास होते. तीन दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या एका बाधीत रूग्ण वृध्देच्या ते संपर्कात आले होते. ते किंवा त्यांचे कोणीही नातेवाईक किनवट येथे आले नाहीत. तरीही आरोग्य पथकाने सबंधितांच्या घरी असलेल्या सात व्यक्तींची तपासणी केली असून कोणतीही लक्षणे न आढळल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन केलं आहे. दिवसातून दोन वेळा त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तेव्हा कोणीही घाबरून जाऊ नये, अफवा पसरवू नये, स्वत : ची काळजी स्वतः घ्यावी,आरोग्य विभागाच्या व प्रशासनाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
               किनवट येथून ५० किंमी अंतरावर तेलंगणात असलेल्या आदिलाबाद येथे वेलमापूरा किनवट येथील तिघे जण एक महिन्यापूर्वी गेले होते. तिथे तीन दिवसांपूर्वी एक वृध्द महिला मृत्यू पावली. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. तिच्या संपर्कात हे तिघे आल्याने त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एक महिन्यापूर्वीपासून ते आजतारखेपर्यंत ते तिघेही आदिलाबाद येथेच आहेत. त्यांचा किंवा तेथील इतर नातेवाईकांचा किनवट येथील कुटूंबातील अन्य सदस्यांशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे आरोग्य पथकाला येथील कुणीही व्यक्ती बाधित आढळली नाही. तरीही खबरदारी म्हणून त्यांच्या कुटूंबातील सात व्यक्तींना घरीच क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे जनतेंनी घाबरून जाऊ नये. अफवा पसरवू नये. सोशल मिडियावरील मचकूरावर विश्वास ठेऊ नये, अधिकृत शासकीय बातम्या वरच विश्वास ठेवावा. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages