आर्थिक अडचणीच्या फेऱ्यात सापडलेल्या कलावंतांनी मदतीसाठी सरकारला घातले साकडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 26 June 2020

आर्थिक अडचणीच्या फेऱ्यात सापडलेल्या कलावंतांनी मदतीसाठी सरकारला घातले साकडे

कलावंतांच्या हाल-अपेष्टा, व्यथांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर
नांदेड- कोरोना या वैश्विक महामारीमुळे
 समाजातील सर्वच घटकांच्या  हाल-अपेष्टा होत आहेत. सर्वांनाच प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे आज राज्यभरातील सांस्कृतिक सादर करणाऱ्या कलावंतांचे देखील बेहाल  होत असून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅण्ड कल्चरल मुव्हमेंट च्या वतीने आज  करण्यात आली आहे.
 महाराष्ट्र राज्यात  आज हजारो कलावंत सांस्कृतिक, सामाजिक आणि पारंपारिक कला सादर करून ते आपली उपजीविका भागवतात. कोरोना या वैश्विक महामारी मुळे गेल्या तीन ते चार महिन्यापासून कलावंतांना कार्यक्रमच नसल्यामुळे जीवन जगावे कसे? असा भयावह प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.
   या कलावंतांना कला सादर करूनच व आपल्या कुटुंबीयांची उपजिविका भागवावी लागते. हातावर पोट असलेल्या कलावंतांचे सध्या बेहाल होत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कार्यक्रमच नसल्यामुळे जगावे कसे? असा भयावह प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.
   या सर्व बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅण्ड कल्चरल मुव्हमेंटच्या वतीने प्रसिद्ध संगीतकार प्रमोद गजभारे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन   इटनकर यांची भेट घेऊन केली.
राज्यातील कलावंतांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. त्यांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न निकाली काढावा. महाराष्ट्राची संस्कृती व परंपरेची पिढीजात जोपासना करणाऱ्या कलावंतांच्या आरोग्यासाठी विमा योजना सुरु करावी. महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी व इतर मागण्यांचा  निवेदनात समावेश आहे.
सदरील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकार यांना देण्यात आले आहे.
 या निवेदनावर प्रसिद्ध संगीतकार प्रमोद गजभारे, विकास जोंधळे, रेखाताई मनाठकर, सिध्दोधन कदम, विकास कवठेकर, राहूल मोरे, बुध्दकिर्ती हुंडेकर, शाहीर रमेश गिरी, अनिल जमदाडे, धनंजय भुरे, रतन चित्ते, रमाकांत वावळे, संगीता राऊत, कु. हरबन्स कौर रामगडिया, संजय जगदंबे, संदीप वाघमारे, संजय भगत, अदित्य डावरे, दिपा बोंडलेवाड आदी कलावंतांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages