औरंगाबाद दि.22 :- जिल्ह्यातील 04 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 11769 कोरोनाबाधित आढळले आहे. त्यापैकी 6497 बरे झाले, 411 जणांचा मृत्यू झाला , तर 4861 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मनपा हद्दीतील रुग्ण(3)
पद्मपुरा (2), छावणी परिसर(1)
ग्रामीण भागातील रुग्ण(1)
वाळूज (1)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत रामनगरातील 42 वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनीतील 65 वर्षीय पुरुष, कासंबरी दर्गाजवळ पडेगाव येथील 55 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
No comments:
Post a Comment