औरंगाबाद, दि. 21 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 197 जणांना (मनपा 164, ग्रामीण 33 सुटी देण्यात आली. आजपर्यंत 6497 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 425 (मनपा 337, ग्रामीण 88) कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11666 झाली आहे. आजपर्यंत एकूण 407 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4762 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 226 रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 38, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 149, ग्रामीण भागात 31, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा हद्दीतील (02)
मार्ड हॉस्टेल परिसर (1), हर्सूल टी पॉइंट (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (37)
अजिंठा, सिल्लोड (1), नवगाव, पैठण (3), दत्त मंदिराजवळ, पैठण (1), आडूळ, पैठण (1), गंगापूर (27), सिल्लोड (2), फुलंब्री (2)
सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (38)
समृद्धी महामार्ग कर्मचारी (3), जय हिंद नगर, पिसादेवी (4), राजे संभाजी नगर, पिसादेवी (4), हर्सुल (1), नारेगाव (1), शिवशंकर कॉलनी (2), एकलहरा (1), नक्षत्रवाडी (1), भावसिंगपुरा (1), ब्रिजवाडी (3),रांजणगाव (6), छावणी (1), वाळूज (4), पीर बाजार (1),राम नगर (1), वैजापूर (1), मुकुंदवाडी (1), म्हाडा कॉलनी (1), गजानन नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
घाटीत दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत सादात नगरातील 45, जैन नगरातील 62 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment