महाराष्ट्रात १ लाख ३२ हजार रुग्णांवर उपचार सुरू ; आज ८ हजार ३६९ कोरोना बाधीत; २४६ मृत्यूची नोंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 21 July 2020

महाराष्ट्रात १ लाख ३२ हजार रुग्णांवर उपचार सुरू ; आज ८ हजार ३६९ कोरोना बाधीत; २४६ मृत्यूची नोंद



मुंबई_दि.२१ | राज्यात आज ७१८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८२ हजार २१७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ नमुन्यांपैकी ३ लाख २७ हजार ०३१ नमुने पॉझिटिव्ह (१९.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २४६ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-३, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-६, कल्याण-डोंबिवली मनपा-३, उल्हासनगर मनपा-५ भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-४, रायगड-४,पनवेल-२, नाशिक-२, नाशिक मनपा-४, मालेगाव मनपा-१, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे-१,  जळगाव-४, जळगाव मनपा-२, नंदूरबार-२, पुणे-१, पुणे मनपा-४०, पिंपरी-चिंचवड मनपा-१५,सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-८, कोल्हापूर-१, कोल्हापूर मनपा-२, सांगली-२, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-१२, जालना-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर-३, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-३, नांदेड-२, अकोला-१, अमरावती-१, यवतमाळ-३, वाशिम-२, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य ३ अशी नोंद आहे.


एकूण: बाधित रुग्ण-(३,२७,०३१) बरे झालेले रुग्ण-(१,८२,२१७), मृत्यू- (१२,२७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,३२,२३६)
 (टीप: राज्यातील जिल्हा व मनपानिहाय कोरोना रुग्णांचे दि. १० जुलै पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन आज करण्यात आले आहे. रुग्णांच्या नावाचे डुप्लिकेशन तसेच त्यांच्या रहिवासी पत्त्यानुसार जिल्ह्यामध्ये झालेला बदल यामुळे प्रगतीपर आकडेवारी ३३ ने कमी झाली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

No comments:

Post a Comment

Pages