किनवट, : जिल्ह्यातील अतिशय दुर्गम व डोंगराळ परिसर म्हणून किनवट ची ओळख आहे.किनवट येथील कोणत्याही विभागातल्या कर्मचाऱ्याला दोनशे किलोमीटर असलेल्या किनवट तालुक्यातील नोकरी म्हणजे शिक्षा वाटते. शिक्षणाच्या निमित्ताने किंवा पूर्वीपासूनचा शहरातील अधिवास असल्याने अनेक कर्मचारी नांदेड शहरातून किनवट तालुक्यात आपली सेवा बजावत असताना दिसते आहे. आज नांदेडला कोरोनाचा बराच प्रसार झालेला दिसतो आहे.
तालुक्यातील गावागावात नांदेड येथून ये-जा करणारे अनेक कर्मचारी आपल्या सेवेच्या निमित्ताने तालुक्यातील लोकांच्या संपर्कात येते आहे.महसूल, आदिवासी विकास प्रकल्प, एकात्मिक बालविकास योजना, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, कृषी विभाग अशा विविध तालुकास्तरीय कार्यालयातील कर्मचारी किनवट मुख्यालयी न राहता नांदेड वरून ये-जा करणारे आहेत, ही बाब तालुक्यात सर्वश्रुत आहे.
Covid-19 या महामारीच्या सात प्रतिबंधासाठी आपल्या देशात विविध उपाययोजना आखण्यात आल्या. शासनाने वेळोवेळी निर्देश देऊन त्या-त्या मुख्यालयी कर्मचाऱ्यांनी काम करावे, असेही निर्देश विविध पत्रातून दिले गेले.तरीही वरील सर्व विभागातील नांदेड येथे राहणारे कर्मचारी आपल्या दुचाकी किंवा चारचाकी या खाजगी वाहनाने किनवटला येऊन सेवा बजावताना दिसत आहे . जिल्हा अंतर्गत प्रवासाला परवानगी असल्याने ये-जा करतांना यांना कोणतेही अडथळे येत नाही. त्यांच्या कार्यालयातील प्रमुखांशी हातमिळवणी करून अनेक वर्षापासून हे असेच चालले आहे. यावर तालुक्यातील जनताही नाराज आहे.पण, अशा संकट काळातही लोक मुख्यालयी न राहता नांदेड शहरातून ये-जा करतात याविषयीही तालुक्यातील लोकांमध्ये असंतोष आणि भीती व्यक्त केल्या जाते आहे.
आज नांदेड शहरात covid-19 या विषाणूने बाधित पाचशेच्यावर रुग्ण आढळलेले आहे. रोज ही रुग्णसंख्या वाढत आहे. अशा काळात किनवट सारख्या दुर्गम आणि आदिवासी परिसरात या ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या दुर्गम आदिवासी बहू तालुक्यात covid-19 आजाराची साथ पसरली तर प्रचंड मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कागदोपत्री जरी मुख्यालय राहत असल्याचे हे कर्मचारी दाखवत असतील तरीही वास्तवात मात्र ते नांदेड वरून ये-जा करतात, असेच दिसून येत आहे. किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात प्रचंड निरक्षरता, अंधश्रद्धा आणि आणि आरोग्याच्या या तुटपुंज्या व्यवस्था असताना, covid-19 ची साथ पसरली तर आदिवासी बांधवांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. दुर्गम परिसरातील या जनतेची काळजी घेण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून त्या-त्या संबंधित विभागातील प्रमुखांना संपर्क करून मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावे . किनवट तालुक्यातील संभाव्य covid-19 प्रसाराचा धोका टाळण्यासाठी वेळीच प्रयत्न करावे अन्यथा जर भविष्यात ही साथ किनवट परिसरात पसरली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किनवट शहरासह तालुक्यातील जागृत जनतेने दिलेला आहे.
No comments:
Post a Comment