"महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे." -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 July 2020

"महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे." -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे२० जुलै अखेरपर्यंत ₹१७,६४६ कोटींचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे.
-
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९०लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलैअखेर २७.३८ लाख खातेदारांना ₹१७,६४६ कोटींचा लाभ देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील ८३%खातेदारांना लाभ देण्यात आला आहे.
-
योजनेत ज्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमानपद्धतीने राबविली जावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages