अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन चरित्र डॉ.भीमराव रामजी आंबेडकर समग्र खंड,अशी विभागणी करून ते जनमानसात पोहचविण्याचे काम जर कोणी केले तर ते आहेत अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन चरित्र डॉ.भीमराव रामजी आंबेडकर समग्र खंड,अशी विभागणी करून ते जनमानसात पोहचविण्याचे काम जर कोणी केले तर ते आहेत आबासाहेब खैरमोडे म्हणजेच चांगदेव भवानराव खैरमोडे.बाबासाहेब म्हणजे काय हे माहिती करून देणाऱ्या या व्यक्तीबद्दलचा परिचय करून घेऊ.
आबासाहेब खैरमोडे यांचा जन्म १५ जुलै १९०४ ला सातारा जिल्ह्यात,खटाव तालुक्यात पाचवड या गावी झाला,त्यांचे शिक्षण साताऱ्यामधील न्यू इंग्लिश स्कुल मध्ये झालं,शाळेत असताना त्यांनी एका स्पर्धेसाठी खादीची महती सांगणारी कविता "शार्दूलविक्रीडीत"वृत्तामध्ये १२ कडव्यात लिहिली होती,त्यासाठी त्यांना "केरळ कोकिळा" चे संपादक नारायण कृष्णाजी आठल्ये यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक ही मिळाले होते. पुढे ते बाबासाहेबांचे मोठे बंधू बाळाराम आंबेडकर यांच्या प्रोत्साहनाने शिक्षणासाठी मुंबईला आले,एल्फिस्टन हायस्कुलमध्ये इंग्रजी माध्यमातून त्यांनी सहावी इयत्तेला प्रवेश घेतला,त्यावेळी बाबाबासाहेब नुकतेच इंग्लंडहून आपले उच्चशिक्षण पूर्ण करून आले होते,आणि "बहिष्कृत भारत" साप्ताहिक मुंबईत ऑफिस थाटून सुरू केले होते,मुंबईत शिकायला आलेल पण राहण्याची सोय नसलेले अस्पृश्य वर्गातील विद्यार्थी,बाबासाहेबांच्या या कार्यालयात रात्री अभ्यासाला व झोपायला येत असत,त्या विद्यार्थ्यांत खैरमोडे ही होते,यावेळी खैरमोडे बाबासाहेबांना विशेष करून लेखनात सहाय्य करीत असत,बाबासाहेबांच्या विद्ववत्तेचा,वैचारिकतेचा आणि कष्टाळू स्वभावाचा खैरमोडेवर खूप प्रभाव पडला,त्याच काळात त्यांनी बाबसाहेबांचे चरित्र लिहिण्याचा निश्चय केला,बाबासाहेब ही कधी-कधी गप्पांच्या ओघात स्वतःबद्दल बोलत असत,लहानपणची आठवण सांगत असत,आणि तूच माझं चरित्र नीट लिहू शकतोस अस म्हणून त्यांना प्रोत्साहन ही देत असत.खैरमोडे यांनी आपले बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईतील ब्रिटिश सचिवालयात ते नोकरी करू लागले.
बाबसाहेबांचे चरित्र लिहायला त्यांनी १९२३ मध्ये सुरुवात केली, एकूण 12 खंड त्यांनी लिहिले,यातील पहिला खंड त्यांनी १९५२ साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रसिद्ध केला,सहाव्या खंडाच्या संपादनाचे काम सुरू असताना १८ नोव्हेम्बर १९७१ मध्ये त्यांचे हृदयविकाराने निधन झाले,त्यांच्या जिवंतपणी त्यांनी बाबासाहेबांचे पाच खंड प्रसिद्ध केले,खैरमोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या उच्चशिक्षित पत्नी द्वारकाबाई खैरमोडे यांनी अडचणींवर मात करीत संपूर्ण जिद्दीने खंड प्रसिद्धी करण्याचे काम पार पाडले,हे खंड प्रकाशित करण्याची जबाबदारी अगोदर सुगावा प्रकाशन व नंतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने घेतली.
बाबासाहेबांचे हे खंड म्हणजे फक्त नोंदी नाहींत तर,त्यांनी त्यात बाबासाहेबांचे विचारदर्शन,दूरदृष्टीपणा,चिकीत्सा याचेही दर्शन घडवले आहेत,अस्पृश्याना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राजकीय व सामाजिक लढा देत त्यांनी जी व्यापक चळवळ उभी केली होती,ते सगळं काम मुद्या व पुराव्यानिशी जगापुढे मांडण्याचे काम सुमारे नऊ हजार पानांचा चरित्रलेखनाचे हे व्यापक काम खैरमोडे यांनी आत्मीयतेने केले,या चरित्र खंडासोबत आणखी काही लिखाण खैरमोडे यांनी केले होते,"पाटील प्रताप" (१९२८) व "अमृतनायक"(१९२९) ही दोन सामाजिक खंडकाव्य त्यांनी सुरवातीच्या काळात लिहिली,तसेच "शूद्र पूर्वी कोण होते,(१९५१) "हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनीती"(१९६१) "घटनेवरील तीन भाषणे" अशा प्रकारचे भाषांतरित साहित्यही त्यांनी लिहिले.
खैरमोडे यांनी लिहिलेले बाबासाहेबांचे चरित्र हे साहित्यविश्वातील फार मौलाचं दस्तावेज आहे,पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हे मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहे,त्यासाठी आमच्या सर्व पिढ्या आबासाहेब खैरमोडे यांचे ऋणी राहतील,मराठीतील चरित्रकार,लेखक,कवी आणि अनुवादक तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहून त्यांच्या जीवनचरित्र आणि लेखनाची सविस्तर नोंद ठेवुन डॉ.भीमराव रामजी आंबेडकर या नावाने १२ चरित्र खंडाचे लेखन करणारे बाबासाहेबांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन, जय भिम..🙏🙏
बाबासाहेब म्हणजे काय हे माहिती करून देणाऱ्या या व्यक्तीबद्दलचा परिचय करून घेऊ.
आबासाहेब खैरमोडे यांचा जन्म १५ जुलै १९०४ ला सातारा जिल्ह्यात,खटाव तालुक्यात पाचवड या गावी झाला,त्यांचे शिक्षण साताऱ्यामधील न्यू इंग्लिश स्कुल मध्ये झालं,शाळेत असताना त्यांनी एका स्पर्धेसाठी खादीची महती सांगणारी कविता "शार्दूलविक्रीडीत"वृत्तामध्ये १२ कडव्यात लिहिली होती,त्यासाठी त्यांना "केरळ कोकिळा" चे संपादक नारायण कृष्णाजी आठल्ये यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक ही मिळाले होते. पुढे ते बाबासाहेबांचे मोठे बंधू बाळाराम आंबेडकर यांच्या प्रोत्साहनाने शिक्षणासाठी मुंबईला आले,एल्फिस्टन हायस्कुलमध्ये इंग्रजी माध्यमातून त्यांनी सहावी इयत्तेला प्रवेश घेतला,त्यावेळी बाबाबासाहेब नुकतेच इंग्लंडहून आपले उच्चशिक्षण पूर्ण करून आले होते,आणि "बहिष्कृत भारत" साप्ताहिक मुंबईत ऑफिस थाटून सुरू केले होते,मुंबईत शिकायला आलेल पण राहण्याची सोय नसलेले अस्पृश्य वर्गातील विद्यार्थी,बाबासाहेबांच्या या कार्यालयात रात्री अभ्यासाला व झोपायला येत असत,त्या विद्यार्थ्यांत खैरमोडे ही होते,यावेळी खैरमोडे बाबासाहेबांना विशेष करून लेखनात सहाय्य करीत असत,बाबासाहेबांच्या विद्ववत्तेचा,वैचारिकतेचा आणि कष्टाळू स्वभावाचा खैरमोडेवर खूप प्रभाव पडला,त्याच काळात त्यांनी बाबसाहेबांचे चरित्र लिहिण्याचा निश्चय केला,बाबासाहेब ही कधी-कधी गप्पांच्या ओघात स्वतःबद्दल बोलत असत,लहानपणची आठवण सांगत असत,आणि तूच माझं चरित्र नीट लिहू शकतोस अस म्हणून त्यांना प्रोत्साहन ही देत असत.खैरमोडे यांनी आपले बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईतील ब्रिटिश सचिवालयात ते नोकरी करू लागले.
बाबसाहेबांचे चरित्र लिहायला त्यांनी १९२३ मध्ये सुरुवात केली, एकूण 12 खंड त्यांनी लिहिले,यातील पहिला खंड त्यांनी १९५२ साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रसिद्ध केला,सहाव्या खंडाच्या संपादनाचे काम सुरू असताना १८ नोव्हेम्बर १९७१ मध्ये त्यांचे हृदयविकाराने निधन झाले,त्यांच्या जिवंतपणी त्यांनी बाबासाहेबांचे पाच खंड प्रसिद्ध केले,खैरमोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या उच्चशिक्षित पत्नी द्वारकाबाई खैरमोडे यांनी अडचणींवर मात करीत संपूर्ण जिद्दीने खंड प्रसिद्धी करण्याचे काम पार पाडले,हे खंड प्रकाशित करण्याची जबाबदारी अगोदर सुगावा प्रकाशन व नंतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने घेतली.
बाबासाहेबांचे हे खंड म्हणजे फक्त नोंदी नाहींत तर,त्यांनी त्यात बाबासाहेबांचे विचारदर्शन,दूरदृष्टीपणा,चिकीत्सा याचेही दर्शन घडवले आहेत,अस्पृश्याना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राजकीय व सामाजिक लढा देत त्यांनी जी व्यापक चळवळ उभी केली होती,ते सगळं काम मुद्या व पुराव्यानिशी जगापुढे मांडण्याचे काम सुमारे नऊ हजार पानांचा चरित्रलेखनाचे हे व्यापक काम खैरमोडे यांनी आत्मीयतेने केले,या चरित्र खंडासोबत आणखी काही लिखाण खैरमोडे यांनी केले होते,"पाटील प्रताप" (१९२८) व "अमृतनायक"(१९२९) ही दोन सामाजिक खंडकाव्य त्यांनी सुरवातीच्या काळात लिहिली,तसेच "शूद्र पूर्वी कोण होते,(१९५१) "हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनीती"(१९६१) "घटनेवरील तीन भाषणे" अशा प्रकारचे भाषांतरित साहित्यही त्यांनी लिहिले.
खैरमोडे यांनी लिहिलेले बाबासाहेबांचे चरित्र हे साहित्यविश्वातील फार मौलाचं दस्तावेज आहे,पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हे मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहे,त्यासाठी आमच्या सर्व पिढ्या आबासाहेब खैरमोडे यांचे ऋणी राहतील,मराठीतील चरित्रकार,लेखक,कवी आणि अनुवादक तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहून त्यांच्या जीवनचरित्र आणि लेखनाची सविस्तर नोंद ठेवुन डॉ.भीमराव रामजी आंबेडकर या नावाने १२ चरित्र खंडाचे लेखन करणारे बाबासाहेबांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन, जय भिम.
-अरविंद वाघमारे
No comments:
Post a Comment