किनवटमध्ये कोरानातून दोन व्यक्ती बरे ,तर दोन बाधित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 July 2020

किनवटमध्ये कोरानातून दोन व्यक्ती बरे ,तर दोन बाधित


                         
किनवट ,दि.१६ : किनवट तालुक्यात आज १६ जुलै रोजी प्राप्त अहवालानुसार २ व्यक्ती बाधीत, तर २ बाधित कोरानातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
             नांदेड येथे पॉझिटिव्ह निघालेल्या सिध्दार्थनगर किनवट येथील ३० वर्षीय तरूणाच्या संपर्कातील व्यक्तिंचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज एकुण ११ अहवालापैकी ६ निगेटिव्ह अहवाल आले. ३ निर्विवाद व २ अहवाल बाधित आले आहेत. तसेच शिवशंकरनगर, गोकुंदा येथील हिमायतनगर येथे निघालेल्या बाधितांच्या संपर्कातील २ बाधित आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत ३ बाधितांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. 
             नवीन बाधितांमध्ये सिध्दार्थनगर येथील ५० वर्षाची १ महिला व ३८ वर्षाचा १ पुरुष यांचा समावेश आहे. यापूर्वी कोविड केअर सेंटर, किनवट येथील १ व डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथील १ रुग्ण असे औषधोपचार घेणारे २ बाधित बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
             नविन बाधितांपैकी  ५० वर्षे वयाची १ महिला त्यांना सर्दी, खोकला, ताप असल्यामुळे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे भरती केले आहे. तर ३८ वर्षे वयाचा १ पुरुष त्यास इतर कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटर, किनवट येथे भरती केले आहे. दोघांवरही औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तालुक्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे
घेतलेले स्वॅब- १२८,
निगेटिव्ह स्वॅब- १०६,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- २
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ५,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- १६,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-१,
मृत्यू संख्या-  निरंक,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ३,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- २,
              कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ऍप सतर्क करेल, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages