किनवट दि 16(ता.प्र.) गोकुंदा उप .जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यास गेलेल्या रुग्णावर वेळेवर योग्य उपचार न करता रुग्णाना व त्यांच्या नातेवाईकाना अपमानित करणाऱ्या काही वैद्यकिय अधिकारी व परिचारीकांची त्वरीत चौकशी करून त्यांना निलंबीत करा अन्यथा लोक हितास्तव मनसे च्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे मनसेचे तालुकाध्यक्ष नितीन मोहरे व शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांनी मा. जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांना दिला आहे .
भव्य इमारत , तज्ञ वैद्यकिय अधिकारी , परिचारीका , इतर कर्मचारी व सर्व सोई सुविधा असलेल्या गोकुंदा येथील उप . जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी तालुक्यातील गोर गरीब जनता मोठ्या संखेने येत असते . दवाखाण्यात उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णाची काही वैद्यकिय अधिकारी रुग्णाची तपासणी करतात . पण काही वैद्यकिय अधिकारी व काही परिचारीका रुग्णाशी उद्धट वागतात . वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अंतर रुग्णास व बाह्य रुग्णास लिहून दिलेला उपचार रुग्णालयात कार्यारत असलेल्या विजया दिनेश बोन्तावार व शुभांगी प्रफूल ठाकरे ह्या रुग्णावर वेळेवर उपचार न करता रुग्णाची जानिवपूर्वक हेळसांड करतात . रुग्णासी व त्यांच्या नातलगासी उद्धट बोलतात , मनमानी वाटेल तेंव्हा इजेक्शन व गोळ्या औषधी देतात . एखादा रुग्ण त्रासाने ओरडत असलातरी त्या कडे दुर्लक्ष करतात , वृद्ध रुग्णावर अरेरावी करून त्यांच्याशी हिन भावनेने वागतात . उपचार करण्यास टाळाटाळ करतात आशा तक्रारी या दोन परिचारीका विरोधात नेहमीच येतात . असे निवेदनात नमुद केले आहे .
नांदेड शहरापासुन १५० कि मी अंतर असल्याने किनवट तालुका अतिदुर्गम , डोंगरी . भागात वाडी , तांड्यावर असलेल्या गोरगरीब आदिवासी ,बजारा व इतर समाजास आत्याधुनिक आरोग्य यंत्रणेचा लाभ व्हावा या हेतूने शासनाने गोकुंदा येथे उप . जिल्हा रुग्णालय कार्यान्वीत केले . रुग्णालयाचा कर्मचाऱ्यांचे वेतन व रुग्ण उपचारासाठी औषधी वर करोडो रुपये खर्च होत असताना रुग्णावर मात्र योग्य उपचार होत नाहीत . थोडा गंभिर आजार आसेल किंवा उपघात झालेले रुग्ण असतील त्यावर थातुरमातूर उपचार करून त्यांना आदिलाबाद किंवा नांदेड ला रेफर केले जाते . परंतु येथील कर्मचारी त्यांच्यावर उपचार करण्याचे थोडे ही कष्ट घेत नाहीत .
सध्या स्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश असताना गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चोख कर्तव्य बजावत असले तरी अंतररुग्ण व अतिदक्षता विभागातील परिचारीका व अन्य कर्मचारी वर्ग रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ करत आहेत . या रुग्णालयातील बेजाबाब दार परिचारीकेची चौकशी करून त्वरीत निलंबनाची कार्यवाही करून गोरगरीब रुग्णावर वेळेवर व योग्य उपचार करण्याचे आदेशीत करावे .
अन्यथा लोकहितास्तव मनसेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार कारभारा विरोधात उग्र स्वरुपाचे अंदोलन करण्यात येईल आसा इशारा देणारे निवेदन मनसेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट , मा. वैद्यकिय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा यांना देण्यात आले असुन निवेदनावर मनसे अध्यक्ष नितीन मोहरे व शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
No comments:
Post a Comment