किनवट,दि.८ : किनवट शहराचे उपनगर समजल्या जाणाऱ्या गोकुंदा(ता.किनवट) येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार ( दि.९) ते रविवारी ( दि.१२ ) पर्यंत अत्यावश्यक सेवेसह जनता कर्फ्यूचा निर्णय लोकप्रति निधी,व्यापारी व नागरिकांच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. गोकुंदा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नगर पालिकेच्या सभागृहात बुधवारी (
दि.८ ) नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी,सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नागरिकांची बैठक घेण्यात आली.सदर बैठकीत दि.९ ते १२ जुलैपर्यंत किनवट शहर व गोकुंदा अत्यावश्यक सेवेसह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.तथापि,नागरिक,रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी १ औषधी दुकान व सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत दूधविक्री सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.या व्यतिरिक्त भाजीपाला,किराणा दुकाने आदी आवश्यक सेवेसह सर्वच प्रतिष्ठाने बंद राहाणार आहेत.४ दिवस बंददरम्यान सर्व वाहतूकही बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.बंदचे उल्लंघन तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला.४ दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतरही सोमवार दि.१२ पासून दररोज सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंतच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी जाहीर केला.या बैठकीस उपनगराध्यक्ष अजय चाडावार,नगरसेवक साजीद खान, श्रीनिवास नेम्मानीवार,जहीर खान पठाण, अभय महाजन,शिवा क्यातमवार,फेरोज तंवर, मधुकर अन्नेलवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिनकर चाडावार,फिरोज हिराणी,प्रा. किशनराव किनवटकर,के.मूर्ती, गोकुंद्याचे उपसरपंच शेख सलीम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे,सूरज सातुरवार, शरद जयस्वाल,पवार स्वामी,संतोष येलचलवार,नितीन मोहरे आदींसह पत्रकारांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment