किनवट तालुक्यात मंगळवारी झाला सर्वदूर हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 15 July 2020

किनवट तालुक्यात मंगळवारी झाला सर्वदूर हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस


किनवट,दि.१५:  तालुक्यातील सातही मंडळात मंगळवारी (दि.१४) हलका व मध्यम   स्वरुपाचा पाऊस  झाला बुधवारी (दि.१५) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकूण १२१ मि.मी.,तर सरासरीत १७.२९ मी.मी.पाऊस झाला.आजही सकाळपासून रिमझिम स्वरुपाचा पाऊस सुरुच आहे.
     तालुक्यात आज मंडळनिहाय झालेला पाऊस असा;(कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये)
किनवट- ५(३११)मि.मी;ईस्लापूर- ८(२७३)मि.मी.;मांडवी - २१
(२३२)मि.मी.;बोधडी- १२(२६४)मि.मी; दहेली-२०(४५३)मि.मी.;जलधरा- १६(२५१)मि.मी.;शिवणी- ३९(३२४)मि.मी.तालुक्यात आज १७.२९,तर आजपर्यंत ३०२.८६ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक पाऊस दहेली मंडळात झाला आहे.सध्या तालुक्यातील नदि नाले वहाते झाले आहेत. बहुसंख्य शेतक-यांनी पिकांच्या आंतरमशागतीची कामे पूर्ण केली आहेत. . काल झालेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. तालुक्याला अजुनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Pages