तीन महिन्यांचे घरगुती विज बिल माफ करावे – सुरेशदादा गायकवाड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 14 July 2020

तीन महिन्यांचे घरगुती विज बिल माफ करावे – सुरेशदादा गायकवाड


नांदेड  :   गेल्या तिन महीन्या पासुन कोरोणा महामारीने जनतेला जिवन जगणं अश्यक्यप्राय करून ठेवलं आहे.
राज्यातील गोर गरीब कष्टकरी जनतेची ऊपासमार थांबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने स्वस्त धान्य पुरवठा करन्याची आणि ईतर सुविधा जाहीर केली गेली.
गेल्या तिन महीन्या पासून राज्यातील सर्व सामान्य माणसा पासुन ते मध्यम वर्गीय समाज हातावर हात मारून रीकामेच बसले आहेत.आता त्यांच्या घरातील सर्व डब्बे रिकामे झाले असतील,होतील.कोणता उद्योग,किरकोळ काम ना अन्य कोणत्याही मार्गाने अर्थार्जन करून घर संसार चालवण्याचा कोणता मार्ग नाही. सर्व मार्ग बंद ठप्प झाले आहेत.घर प्रपंच कशा प्रकारे चालवायचा हाच प्रश्न त्यांच्या समोर आहे.
अशा गंभीर जिवघेण्या परिस्थिती मध्ये महाराष्ट्र सरकारने नाॅन कमर्शियल विज वापराचे भरमसाठ बिल देणे सुरू केले आहे.आता लाईट बिल कसे भरायचे?
कोरोणा काळातील नाॅन कमर्शियल विज वापर बिल रद्द करावे.
   राज्यातील जनतेचे विज बिल माफ करण्याची घोषणा करण्यास प्रवृत करावे .
अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली .

   

No comments:

Post a Comment

Pages