आमदार केरमांच्या पत्राची वन मंत्र्यांनी घेतली दखल प्रधान वनसंरक्षकांनी समिती गठीत करून उगारला कार्यवाहीचा बडगा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 21 July 2020

आमदार केरमांच्या पत्राची वन मंत्र्यांनी घेतली दखल प्रधान वनसंरक्षकांनी समिती गठीत करून उगारला कार्यवाहीचा बडगा



किनवट ,दि.21  : मांडवीचे वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक यांच्या कामकाजा विरुद्ध आमदार भीमराव केराम यांनी वन मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी कामी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी समिती गठीत केली असून त्यात पांढरकवडा येथिल उपवनसंरक्षक के.एम.अभर्णा हे अध्यक्ष तर सदस्य म्हणून वर्धाचे सहाय्यक वनसंरक्षक भीमसींग ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली असून उपवनसंरक्षक कार्यालय हदरले हे विशेष.
         किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी  ७ जुलै २०२० रोजी महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे मांडवी वन परिक्षेत्र कार्यालयाचे (प्रादेशिक) वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. वनमंत्र्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन १३ जुलै रोजी  चौकशीकामी एक समिती गठीत करण्यासाठी नागपूर येथिल प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना आदेशित केले आहे. त्यावरुन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी क्र.-कक्ष १० (१)/आस्था/एक/प्र.क्र.१९(२०-२१)/१९१,नागपूर ४४०००१, १६ जुलै २०२० आदेशान्वये एक समिती गठीत केली आहे.१६ जुलै रोजी गठीत केलेल्या समितीत पांढरकवडा वनविभागाचे (प्रादेशिक) उपवनसंरक्षक के.एम.अभर्णा समितीच्या अध्यक्ष असून वर्धा वनविभागातील सहाय्यक वनसंरक्षक भीमसींग ठाकूर हे सदस्य आहेत. सदर समितीने एक महिन्याच्या आत चौकशी करुन त्यांच्या अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांनी फर्मावले आहे. नांदेडच्या  उपवनसंरक्षकांनी चौकशी दरम्यान समितीला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी निर्देश बजावले आहेत.आमदारांनी वनपरिक्षेत्र अधिका-याच्या कामकाजा विरुद्ध तक्रार करण्याची कदाचित किनवटच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल.आमदार केरामांच्या तक्रारीत तथ्यता असणारच. यात तिळमात्र शंका नसून या आठवड्यात चौकशीला सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकंदरीत मानवी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याविरुद्ध लागलेल्या चौकशीकडे अख्या जिल्ह्याचे लक्ष लागून असूनप्रधान वनसंरक्षक यांनी समिती गठीत करून उभारलेल्या कार्यवाहीच्या पडल्याने गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या मांडवी किंबहुना किनवट तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनवर कार्यवाहीची टांगती तलवार घोंघावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Pages