नांदेड
नांदेड जिल्ह्यातील ग्राम - पंचायतीवर महाविकास आघाडीच्या समन्वयातून प्रशासकासोबतच ग्रामीण पञकारांचा हि विचार व्हावा व त्यांना प्रशासक म्हणून संधी देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्राम पंचायतीची मुदत संपत असल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे . तसेच राजकीय लोकांना ही संघी पुन्हा मिळणार असून ग्रामीण पत्रकार सुद्धा गावातील सामान्य आणि या पदास पात्र व्यक्ती आहे. ग्रामीण भागातील पत्रकाराला गावातील सर्व प्रश्नांची चांगली जाणीव असते तसेच त्याचा जनसंपर्क ही दांडगा असतो. त्यामुळे ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून ग्रामीण भागातील पत्रकार उत्तम कामगिरी करू शकतो. म्हणून पत्रकाराला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी "पञकार संरक्षण समिती " च्या वतीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून त्या - त्या गावातील ( भागातील ) ग्रामीण पत्रकाराची नेमणूक करावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील, दक्षिण विभागप्रमुख प्रशांत बारादे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment