राजगृह हल्ला प्रकरणी सुत्रधाराला अटक करा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रियराज्यमंत्री आठवलेंनी राजगृहाला दिली भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 July 2020

राजगृह हल्ला प्रकरणी सुत्रधाराला अटक करा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रियराज्यमंत्री आठवलेंनी राजगृहाला दिली भेट


मुंबई दि. 10 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान म्हणून सर्व समाजाची अस्मिता असणारे राजगृह हे निवासस्थान पवित्र आणि ऐतिहासिक आहे. या राजगृहावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी ; या प्रकरणाची सखोल चौकशी करून   हल्ल्यामागील सुत्रधाराला अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. आज दि. 10 जुलै रोजी ना रामदास आठवले यांनी दादर हिंदू कॉलनी येथील  राजगृह ला भेट दिली. या वेळी आंबेडकर कुटुंबियांची ना रामदास आठवले यांनी भेट घेतली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांची भेट घेऊन ना रामदास आठवलेंनी चर्चा केली.यावेळी रिपाइं चे अविनाश महातेकर; काकासाहेब खंबाळकर; सुरेश बारशिंग; अशोक भालेराव;नागसेन कांबळे; सिद्धार्थ कासारे; आदी मान्यवर उपस्थित होते.

राजगृह हे आंबेडकर कुटुंबियांचे आहे तसेच राजगृह ही आंबेडकरी समाजाची अस्मिता आहे. राजगृह   हल्ला प्रकरणी कोणीही राजकारण करू नये असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.राजगृहाला पूर्ण वेळ पोलीस संरक्षण म्हणून येथे पोलीस चौकी उभारावी तसेच राजगृह हल्ल्याची सी आय डी मार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर आणि आमचे राजकीय मतभेद आहेत मात्र  या प्रसंगात सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही सर्व आंबेडकर कुटुंबियांसोबत आहोत. राजगृह हल्ला निषेधार्ह असून या प्रसंगी आम्ही गटतट बाजूला ठेऊन एकजुटीने आंबेडकर परिवारासोबत आहोत त्याची ग्वाही म्हणून आज राजगृहात येऊन आंबेडकर कुटुंबीयांपैकी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतल्या चे ना.रामदास आठवले म्हणाले. तसेच राजगृह  प्रकरणी कोणीही राजकारण करू नये असे आवाहन ना.रामदास आठवले म्हणाले. यावेळी  राजगृहाबाहेर रिपाइं च्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यात विवेक पवार; विनोद निकाळजे; सुनील मोरे; रवी गायकवाड;  सो ना कांबळे; तरणजीत सिंह; गौतम गायकवाड; विशाल दिवर; विजय वाघमारे;ऍड अभयाताई सोनवणे; भीमराव सवातकर;  आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

             

No comments:

Post a Comment

Pages