वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्ता सहाय्य संघा ची स्थापना. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 20 July 2020

वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्ता सहाय्य संघा ची स्थापना.


दिनांक 19 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक वाडिया कॉलेज समोर आपल्या पिढीतील आपले सर्वांचे सहयोगी मित्र राहुल डंबाळे यांची कन्या आपली सर्वांची मुलगी प्रवर्तना हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्ता सहाय्य संघा ची स्थापना केली गेली.

प्रवर्तना राहुल डंबाळे हिच्या वाढदिवसानिमित्त आज पुणे येथील विविध संघटनांमध्ये काम करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने सामाजिक जाणिवेतून चळवळीतील कार्यकर्त्यांना सहयोग करण्यासाठी कार्यकर्ता सहाय्य संघाची स्थापना करण्यात आली. तसेच यावेळी गरजू नागरिकांना धान्य वाटप देखील करण्याचा कार्यक्रम कष्टकरी पंचायतीचे नेते बाबा कांबळे यांनी आयोजित केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष विठ्ठलदादा गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
महामानवांची जीवनचरित्र असणाऱ्या पुस्तकांचे वाटप देखील प्रवर्तना चे हस्ते केले प्रेरणा विठ्ठल गायकवाड तसेच  भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी गृहराज्यमंत्री मा. रमेशदादा बागवे हेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शुभेच्छा व मार्गदर्शन करत होते.
यावेळी सुवर्णा डंबाळे यांनी उपस्थितांची व कार्यक्रमाचे आयोजक यांचे विशेष आभार मानले. तसेच या सहायता निधीसाठी दहा हजार रुपये निधी संयोजकांकडे सोपवला.

No comments:

Post a Comment

Pages