नांदेड दि 15 : मेडिकल च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी होणारी प्रवेश परीक्षा AIAPGET साठी कोरोना ग्रस्त परिस्थिच्या पार्श्वभूमीवर अकोला नागपूर अशी काही नवीन परीक्षा केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलीत परंतु मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी एकही सेंटर दिलेलं नाहीये,,कोरोना ग्रस्त परिस्थिती मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी नाशिक,पुणे,मुंबई किंवा नागपूर येथे एवढ्या दूर प्रवास करून जाणे आणि तिथे हॉटेल किंवा लॉज उपलब्ध होणे किंवा उपलब्ध झाली तरी तिथे राहणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.कोरोना ग्रस्त परिस्थिती लक्षात घेता मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना औरंगाबाद किंवा नांदेड येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देऊन मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी .
वरील मागण्याचे निवेदन स्वप्नील इंगळे पाटील(प्रदेश कार्यकारणी सदस्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस)
यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पाठविले आहे.
वरील मागण्याचे निवेदन स्वप्नील इंगळे पाटील(प्रदेश कार्यकारणी सदस्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस)
यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पाठविले आहे.
No comments:
Post a Comment