जुना संघर्षशील पॅंथर आणि दलितांचा एक सजग प्रहरी बबन लवात्रे यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. बबनराव संवेदनशील आणि सर्जक समाज प्रहरी होता.त्यात प्रासंगिकता असायची. पॅंथरची आग थंड झाली असली तरी बबनरावातील ती आग थंड झाली नव्हती. ते सतत नवीन नवीन मुद्दे घेत अन्याया विरुध्द आपदा आवाज बुलंद करीत राहिलेत. दलितांवरील अत्याचारांच्या विरुध्द लढणे हे त्यांचे ब्रिद होतेच शिवाय पुढे ते सत्यशोधना कड़े वळूण त्यांनी इतिहास संशोधन पर लिखाने ही केले.
कबिरांवर लिहिले,पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर लिहून ते बुध्दाचे महाविहार होते हे भक्कम आधार देत दमदार पणे मांडले, साहित्य क्षेत्रात अधिकारवाणीने वावरले,दरवर्षी नागपुरात साहित्यिक मेळावे घ्यायचे,बौध्द विद्यापीठ व्हावे या मांगती साठी ते प्रखरपणे लढले,त्यासाठी लॉंग मार्च काढला .
बबनभाऊशी माझा संबंध एक पत्रकार म्हणून राहिला,ते कोणतीही नवीन पुस्तक प्रकाशित करायचे,त्याची एक प्रत मला आवर्जून द्यायचे.या निमित्ताने त्यांच्याशी चळवळी विषयक चर्चा व्हायच्या,अशातच त्यांची एक दीर्घ मुलाघत मी आणि प्रथा रत्नाकर मेश्राम यांनी घेवून दै जनतेचा महानायक मध्ये प्रकाशित केली होती,तेव्हाचे पॅंथर समाजासाठी,आपल्या जीव तळहातावर घेवून जगायचे,हे पदोपदी लक्षात येत होते.या लोकांनी तेव्हा आपले तारुण्य समाजासाठी कुर्बान केले होते.
त्यापैकी एक बबनराव होते,त्यांनी तेव्हा आपल्या घरादाराची पर्वा केली नव्हती,या मुलाखतीला दीड दोन वर्ष झाले असतील तेव्हा पासून त्यांची भेंट नव्हती,पण या मुलाखती वेळी बबनभाऊंवर वृध्दावस्था वेगाने अतिक्रमण करीत आहे याची प्रचिती तिव्रतेनी होता होती,अशांत आज दुपारी पॅंथर हरीष वंजारी,त्यानंतर सुधीर भगत यांचा फोन आला,तुकाभाऊ कोचेंना फोन केला आणि बबनरावांच्या निधनावर विश्वास बसला, चळवळीचा इतिहास लेखक पॅंथर बबनरावांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली !...अलविदा पॅन्थर.........
No comments:
Post a Comment