नांदेड   दि. 19 :- पुसद तालुक्यातील पैनगंगा नदीवरील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर) धरण 73 टक्के भरले असून या धरणातून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला असल्याने धरणाच्या पाणी पातळीत अतिशय वेगाने वाढत होत आहे. सध्या धरणात अंदाजे 753 घनमी / सेकंद इतका येवा येत आहे. अशाच प्रमाणात येवा धरणात येत राहिल्यास येत्या 4 ते 5 दिवसात धरण शंभर टक्के भरेल. इसापूर धरणातील पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीपात्रात सोडल्यामुळे पेनगंगा नदीला पूर येऊ शकतो हे लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिला आहे.
संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पेनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांना आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत संबंधित तहसिलदार, पोलीस विभाग यांना सुचना देण्यात आली आहे, अशी माहिती उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
Wednesday, 19 August 2020
इसापूर धरणाचा पाणीसाठा 73 टक्क्याच्या पुढे पेनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता
Tags
# जिल्हा
      
Share This 
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment