नांदेड , : कायद्यात राहून व्यापार करणा-यांना सगळे नियम, मटके , पत्याचे क्लब , सट्टा , बेटिंग करणारे बिनधास्तपने राजकीय वरदहस्त ठेवून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालवत आहेत व यातून येणाऱ्या अवैध पैसे च्या जोरावर नांदेड चे वातावरण खराब करणारी गुंडगिरी चालवली जात आहे प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेणे गरजेचे आहे नाही तर नांदेड हा गुन्हेगारीचा प्रवृत्ती च्या लोकांचा अड्डा होण्यासाठी वेळ लागणार नाही,असा धोक्याचा इशारा फुले- शाहू-आंबेडकर युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष स्पप्नील नरबाग यांनी दिला आहे.
नांदेड शहरात ढासळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत तरी असे दिसत आहे की इथल्या पोलीस प्रशासनाला नैतिकता उरली आहे की नाही , हातावर पोट असणारे व्यापारी यांच्याकडून सुद्धा खंडणी वसूल करणारे भाई लोक तयार झालेले आहेत, याकडे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे,असा आरोपही नरबाग यांनी केला आहे
No comments:
Post a Comment