जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ पत्राला सारखणी सह इतर बँकांनी दाखवली केराची टोपली! शेतकरी पीक कर्ज प्रश्नावर आ.भीमराव केराम संतप्त;, मुजोर व्यवस्थापकांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेला पत्र - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 2 August 2020

जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ पत्राला सारखणी सह इतर बँकांनी दाखवली केराची टोपली! शेतकरी पीक कर्ज प्रश्नावर आ.भीमराव केराम संतप्त;, मुजोर व्यवस्थापकांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेला पत्र



किनवट,दि.२ : जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी सुरुवातीला पीक कर्जासाठी ऑनलाईन नोंदणीचा ससेमिरा पूर्ण केला.परंतु, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बँका दारावर उभे करत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने किनवट विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्ज संदर्भात होणाऱ्या हेळसांड चे वास्तव वर्णन पत्राच्या माध्यमातून अवगत केले. ‘त्या’ पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी एक परिपत्रक निर्गमित करुन कोणत्याही घटकातील शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना त्रास होऊ नये याची सुस्पष्ट नियमावली आखून दिली. परंतु, भारतीय स्टेट बँक शाखा, सारखणी सह माहूर व किनवट तालुक्यातील बँका जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत शेतकऱ्यांना हीनतेची वागणूक देऊन छळत आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापकाना पत्र पाठवून माहूर व किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांची पिक कर्जाची व कर्ज माफी प्रकरणाची मागणी पूर्ण करून त्यांना सोयीची व्यवस्था निर्माण करून देण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडविले गेले नाही तर मात्र कार्यवाही चा बडगा उगरणार असल्याचे सांगितले आहे.

कर्ज माफी झालेल्या व नवीन पीक कर्ज मागणीसाठी बँकेचे उंबरठे झिजवनाऱ्या माहूर व किनवट तालुक्यातील शेतकरी बांधवांना स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा सारखानी सह दोन्ही तालुक्यातील विविध शाखा व्यवस्थापक नव नवीन नियमाची सरबत्ती लाऊन शेतकऱ्यांनाअडचणीत अनत आहेत.सुरवातीला शेतकऱ्यांनी खाजगी संगणक चालकांना शंभर रुपये देऊन ऑनलाईन नोंदणी केली.परंतु, त्या नोंदणी नुसार कोणतीच कार्यवाही झाली नाही.किंबहुना कुठ्ल्याही शेतकऱ्याला मेसेज आले नाही. उलट कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांचे त्या त्या शाखेत खाते असताना सुध्दा त्यांना माफीचा लाभ दिले जात नाही.या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नावर नेहमीच अधिकारी यांची आक्रमक पणे कान उघडणी करणारे किनवट चे आ.भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून शेतकऱ्याच्या छळवणुकीला वाचा फोडली होती.त्याचे फळ स्वरूप जिल्हाधिकारी यांनी दिनांक २३ जुलै रोजी एक परिपत्रक निर्गमित करून ज्या बँकेत कर्ज माफी मिळाली त्या शाखेत शेतकऱ्यांना पिक कर्ज संबंधित बँकांनी वाटप करणे अपेक्षित आहे,असे स्पष्ट आदेश दिले होते.या आदेशाला स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा सारखणी व इतर बँकांनी केराची टोपली दाखवल्याची परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याने आ.भीमराव केराम संतप्त झाले असून सदर प्रकरणी शेतकऱ्यांच्या सहन शीलतेचा बांध फुटन्याआधी तातडीने लक्ष पुरवून किनवट व माहूर तालुक्यातील बँक शाखेत शेतकऱ्यांची पिक कर्ज वाटपासाठी होणारी अडवणूक थांबवून संबंधित बँकेत पूर्वीपासून ग्राहक,कर्जदार असलेल्या पात्र शेतकऱ्यांना सुरळीत कर्ज वाटप व्हावे या हेतूने आपल्या माध्यमातून सूचना देण्यात यावे,अशा स्वरूपाचे पत्र दिनांक ३१ जुलै रोजी व्यवस्थापक,जिल्हा अग्रणी बँक, नांदेड यांना पाठवून सहकार्याची अपेक्षा व्यक्तविली आहे.या ही नंतर जर बँकाच्या अलिखित व स्वयं घोषित कारभारात सुधारणा झाली नाही तर मात्र याचे दूरगामी परिणाम बँकांना भोगावे लागले, असा सज्जड इशारा आ. केराम यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Pages