नांदेड: मागच्या अनेक दिवसांपासून वारंवार मागणी करूनही शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेची प्रलंबित रक्कम अद्यापही पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांवर हे सरकार जाणीवपूर्वक अन्याय करत असून ही रक्कम तत्काळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी आशा आशयाचे निवेदन एनएसवायएफ या विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याणचे सहायक आयुक्त यांच्या मार्फत प्रादेशिक उपायुक्त तसेच राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2019-20 संपले आहे पण अद्यापपर्यंत भारत सरकार शिष्यवृत्ति व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम पात्र लाभार्थी विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा झाली नाही. परिणामी लॉकडाऊन काळात त्यांच्यावर शिक्षण खर्चाचा अर्थीक भुर्दंड पडत आहे.
तर दुसरीकडे आपल्या मंत्रालयाने सामाजिक न्यायविभाचा 47 करोड एवढा राखीव निधी सरकारी संस्था सारथी यास दिला आहे, अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कल्यानाचा निधी सामाजिक न्याय विभागाने मराठ जातीच्या शैक्षिक कल्याणासाठी वापर करत आहात हे चुकीचे आहे.
सामाजिक न्यायमंत्री महोदय यांनी कोरोनामुळे कुठे विद्यार्थ्याच्या पालकाना रोजगार मिळत नाही. त्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या परिवारावर उपास मारीची वेळ आली आहे.ही महत्त्वाची बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे मेस व रूमच्या किरायाचे कर्ज विद्यार्थ्यावर झाले आहे. याची आपनास जानिव नसेल म्हणूनच अद्यापर्यंत आपन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले नाहीत.
तसेच सारथी मार्फत मराठा जातीच्या एम.फिल,पि.एचडीच्या सर्व संशोधक विद्यार्थ्याना फिलोशिफ दिली जात आहे. शासनाने याच धर्तीवर बार्टी मार्फत अनूसुचीत जातीतील एम.फिल,पि.एचडीच्या राज्यातील सर्व संशोधक विद्यार्थ्याना युजीसी च्या दराप्रमाने फिलोशिफ देन्यात यावी. तसेच यासोबतच मुख्य मागणी म्हणजे भारत सरकार शिष्यवृत्ति व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधारचे पैसे त्वरित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करावे., बार्टीच्या मार्फत अनूसुचित जातीतील एम.फिल,पि.एचडी च्या सर्व संशोधक विद्यार्थ्याना फिलोशिफ सूरू करण्यात यावी., परदेशी शिक्षण घेना-या विद्यार्थ्याची शिष्यवृत्तिची जाहिरात लवकर काढण्यात यावी. सदरील मागण्या तात्काळ मंजूर न केल्यास हजारो विद्यार्थ्यांसह नांदेड येथील सामाजिक न्याय भवनासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात प्रशासनास दिला आहे. सदरील निवेदनावर नॅशनल एससी,एसटी ओबीसी युथ फ्रंटचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन दवणे, राज्य प्रवक्ता प्रा.सतिश वागरे, धम्मपाल वाढवे,अक्षय कांबळे,महेश जोंधळे,प्रविणकुमार सावंत,बाळू भाग्यवंत,शुभम दिग्रसकर,मारोती बरमे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment