घरकुल हक्क संवर्धन समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 1 August 2020

घरकुल हक्क संवर्धन समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न



नांदेड , :  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने बाबुराव विद्या संकुल, लालवाडी, नांदेड येथे शनिवारी(दि.१) रोजी दहावी व बारावी गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा,  घरकुल हक्क संवर्धन समिती नांदेड यांच्या वतीने आयोजित केला होता.

यावेळी बनारसबाई कांबळे या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून फुले-आंबेडकरी चळवळीतील  जेष्ठ नेते एन.डी.गवळी, गुलशन कंधारे,नालंदा गच्चे, रोहन कहाळेकर,सुनीता सदावर्ते,श्याम निलंगेकर हे होते.

 प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

  प्रमुख मार्गदर्शक म्हणून घरकुल हक्क संवर्धन समितीचे अध्यक्ष श्याम निलंगेकर मार्गदर्शन करताना म्हणाले, 'लहानपनापासून मुलांच्या कला गुणांची जोपासना केली तर विध्यार्थी गरुडझेप घेतल्याशिवाय राहणार नाही.'

यावेळी गुणवंत विद्यार्थीनीं नेहा दिलीप कांबळे,रूचिका श्याम निलंगेकर,संध्याराणी उत्तम हानमंते,चेतना धनराज अत्रे,अंकिता दिलीप भुरे,प्रज्ञा बालाजी पंडीत या दहाव्या वर्गात विशेष प्राविण्य मिळवलेल्या  गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
 प्रास्ताविक रंगनाथ भालेराव यांनी, तर सूत्रसंचालन सदानंद गायकवाड यांनी केले.

यावेळी दिनेश कंधारे,स्वाती खंदारे,संघमित्रा बळवंते,रंजणा पंडित,भाग्यश्री वाघमारे,प्रणिता दवणे,नालंदा गच्चे व घरकुल लढवय्ये योद्धया वर्ग मोठया प्रमाणात  उपस्थित होता.



No comments:

Post a Comment

Pages