[ प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम ! - संपादक ]
भाग - २.
तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने प्रेरीत होऊन माधवराव तुकाराम मुनेश्वर यांनी किनवट तालुक्यातील अंबाडी या त्यांच्या जन्मगावापासुन गीत गायाला सुरवात केली. त्यांचा जन्म १९६०च्या दशकातला. शिक्षण जेमतेम पाचवी. जुण्या गायकांची गाणी ऐकुण गायणाची आवड निर्माण झाली. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी गीत गायाला सुरवात केली.
शाहीर दलितानंद , वामनदादा कर्डक, मुंबई चे झुंजारे यांच्या गायनात मागे बसुन कोरस देत असत तेथुनच त्यांच्या गायणाला खरी सुरुवात झाली कृष्णा शिंदे, प्रल्हाद शिंदे यांचे रेकार्ड गीते ऐकून त्या प्रमाणे म्हणण्याचा प्रयत्न करायचे. गायिका शुषमादेवी यांचे कार्यक्रम ऐकून त्यांच्या प्रभावी गीत गायणामुळे माधवराव मुनेश्वर यांनी स्टेज कार्यक्रम सुरू केले. ते रेल्वे मध्ये नौकरीला होते पण गायणातच जास्त वेळ देत असल्याने साहेब ही त्यांना म्हणायचे तु गीतगायणच कर नंतर त्यांनी नौकरी सोडुन दिली व प्रबोधन चळवळीत उडी घेतली. सोयरेधायरे म्हणायचे समाज काय देणार.पेटी घेऊन फिरतो म्हणुन टिंगल करायचे त्याची पर्वा न करता त्यांनी आपले काम चालुच ठेवले. लोकामध्ये गेल्यामुळे मान सन्मान भेटला यात खुप मोठी ताकत आहे त्यामुळे सामाण घेऊन निस्वार्थीपणे या कलेत रममाण झाले.त्यांच्या संचात ते पेटी वाजवत व तबला साथ पुंडलिक कांबळे,मधुकर जाभाडे तर कोरसला वामण गायकवाड, निवृत्ती नगराळे, पुरुषोत्तम तामगाडगे, विलास कानिंदे, रमेश हलवले हे नेहमीच सोबतीला असत. पंचशील गायण पार्टी किनवट परीसरात प्रसिद्ध होती.
जयंती सोहळा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन असो वा धम्म मेळावा या निमित्ताने खेडोपाडी रसिकांपर्यंत जाता आलं. लोक आग्रह करून बोलवत ते जात असत. परीसरातील असंख्य कार्यक्रमात रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ही त्यांच्यासाठी आनंदाची बाब. त्याचे स्टेज कार्यक्रम परीसरात घोटी, कोठारी , उमरी बाजार, मांडवी, पार्डी, गोंडवडसा, अंजनखेड, सावरी, बोधडी,चंद्रपुर, जलधरा, इस्लापुर, भुलजा नागझरी, वंजारवाडी,सिंदगी, मोहपुर, दाभाडी, येंदा ,पेंदा, कोपरा, सारखणी वझरा या माहुर किनवट परीसरात झाले. भोकर व रेणापुर या शिवाय आंध्रप्रदेशात तलामडगु, खंडीगुडा, आदिलाबाद, इंदरवेली, खोडद, पिपरी, सितागोंदी, जांभळी, पिपलधरी ईत्यादी ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम झाले. त्यांनी अनेक गीतं लिहिली. कवी बी.गौतम यांच्या गीत संग्रहात कवी माधवराव यांची दोन गीतं प्रकाशित झाली .ते स्वरचित गीताबरोबर वामनदादा कर्डक, मनोजराजा गोसावी यांची गीते गातात . या गाण्यामुळे मनोजराजा गोसावी, सूर्यकांत भगत, बी.काशिनंद, दलितानंद, शुषमादेवी, प्रज्ञा इंगळे ,परमानंद भारती ,सरवर जानी, साहेबराव येरेकार, विष्णु शिंदे, दत्ता शिंदे ,शालीनी शिंदे, वैशाली शिंदे ,सुहासिनी शिंदे,आनंद शिंदे, ललकार बाबु, साधना मेश्राम, देवराव हुटाडे, करुणा सागर या गायक कलावंतांचा सहवास लाभला.अंबाडीला बरेच कार्यक्रम झाले.प्रकाशनाथ पाटनकर यांच्या स्टेजवरही गाता आले.
गायक माधवराव मुनेश्वर यांच्या प्रभावामुळे घरात त्यांची पत्नी रमाबाई ह्या पण महिला मंडळाच्या कार्यक्रमात गीतगायण करतात. तसेच गायक रूपेश व सिद्धार्थ मुनेश्वर हे उत्कृष्ट स्टेज कार्यक्रम व सामण्याचे कार्यक्रम करतात. गायिका मंगला कावळे व गायिका पंचशिला पाटील ह्या यांच्याच मार्गदर्शनाने तयार झालेल्या आज त्या ही सुंदर गातात .
मनपसंत गीते-
१)जयंती भीमाची बोले, जयंती भीमाची|
मनी आठवा रे क्रांती भीमा गौतमाची||
२)भीमासम दाखवा असा मायचा लाल कुणी|
झाला ना आज इथे,होणार नाही कुणी||
३)गालात ही गुलाबी,ओठातही गलाबी|
शालु हिचा गुलाबी, हरली ती आम्रपाली||
४)ओ भीमजी$$$ गांधीको बचाओ|
रखो लाज मेरी,गांधी को बचाओ||
५)साथ दिली गरीबीत,असा करुन निर्धार|
रमाबाईंनी सजविला माझ्या भीमाचा संसार||
सन्मान- लाँर्ड बुद्धा टी.व्ही वर चमकते सितारे मिले गाँव हमारे या कार्यक्रमात त्यांची मुलाखत झाली जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांनी सादर केली .तालुका प्रतिनिधी उत्तम कानिंदे व महेंद्र नरवाडे किनवट यांच्यामुळे ती संधी मिळाली.हा सन्मान कदाचित गायण क्षेत्रात नसतो तर झाला नसताअसं ते आवर्जून सांगतात. महाराष्ट्र, कर्णाटक,मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातुन फोनवर शुभेच्छा मिळाल्या.
गायक माधवराव तुकाराम मुनेश्वर व त्यांची मुले रुपेश कुमार मुनेश्वर व छोटा राजा म्हणुन प्रबोधन चळवळीत ज्यांनी पदार्पण केलंय तो सिद्धार्थ मुनेश्वर यांचेही गायण क्षेत्रात नाव लौकीक होवो! ह्या मंगलकामनेसह हार्दिक शुभेच्छा!
-आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट.मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment