[प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत.. संपादक]
भाग -१२.
प्रसिद्ध गायक अनिल उमरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा लेखरुपाने आढावा!
प्रसिद्ध गायक प्रज्ञाचक्षूअनिल बाबाराव उमरे यांचा जन्म १२ आगष्ट१९८८साली किनवट तालुक्यातील सिंदगी (मोहपुर) येथे झाला.बोधडी येथील अंध विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले .संगीतातील संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली.लहाणपणीच त्यांना संगीत कला अवगत झाल्याने याच आवडीच्या क्षेत्रात आपले करीअर घडवण्याचा निश्चय केला.
अंध विद्यालयात शिक्षण घेतांना त्यांचे गुरु संगीतातील राज समजले जाणारे पंडित वसंत महादेव शिरभाते यांचे तसेच राजेस गजानन ठाकरे ,तबला उस्ताद दत्ता नारायण पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. हे प्रज्ञाचक्षु(अंध) गायक कलावंत आहेत. हार्मोनियम, तंतुवाद्य, तबला, ढोलक, मृदंग, सिंथोसायझर असे अनेक वाद्य वाजवतात. त्यांना शास्त्रीयगायन कलेतील परिपुर्ण गायक म्हणता येईल.कोणत्याही गाण्याला ते संगीत देऊ शकतात असे ते संगीत तज्ञ आहेत.कोरोणा या महामारी च्या संदर्भातील शासनाच्या जनजागृती कक्षातील कलावंतांच्या गीतांना नुकतेच त्यांनी संगीत दिले आहे.ते संगीतही शिकवतात.
त्यांची पत्नी प्रज्ञाचक्षू लता अनिल उमरे ही पण संगीत विशारद आहे. त्याही गीत गाण्यासाठी स्वत:सोबत राहुन साथ देतात. त्यांची मुलं ही संगीत शिकत आहेत. किनवट माहुर परीसरात अनेक ठिकाणी जयंती सोहळा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरीनिर्वाण दिन , धम्म परीषद, मेळावे यांमध्ये तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, माता रमाई, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गीतं सादर करुन जनप्रबोधन केले.भारतीय बौद्धमहासभा तालुका किनवट तर्फे आयोजित बौद्धधम्म परिषदेत राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत स्टेज कार्यक्रम करून प्रबोधन केले. तसेच 'किनवट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सहा डिसेंबर ला 'गाणे निळ्या नभाचे 'या अभिवादन गीताच्या कार्यक्रमात ही अनेक वेळा गीतगायण केले.माहुर लाही कार्यक्रम केले.
संगीत साथ देण्यासाठी त्यांच्या सोबत रामा शिवाजी काळे मराठवाडा संगीत रत्न,संगीत व गायण साठी . तबला-संजय आणेराव, हार्मोनियम-प्रदिप नरवाडे हे संचात त्यांच्या सोबत असतात. महाराष्ट्र, गुजरात,राज्यस्थान, आंध्रप्रदेश व कर्णाटक ला ही त्याचे कार्यक्रम झाले .त्यांच्या आवाजामध्ये रसिकांना खिळवून ठेवण्याची जादू व संगीतातील तालावर डोलायला लावण्याची ताकत आहे. आनेक ठिकाणी रसिकांनी बक्षीसं दिली.तसेच या कलेमुळेच त्यांना चर्च च्या माध्यमातुन इस्राईलला जाता आलं.या शिवाय भावगीते, भजनं , चित्रपट गीतं अशी सर्व प्रकारची क्लासिकल गीतं ते सादर करतात.सर्व जातीधर्माच्या लग्न विधी प्रसंगी मंगल आष्टके व मनोरंजन गीतं सादर करतात.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या सोबत त्यांचा सामना झाला.एका गीतगायण स्पर्धेत पद्मजा जोगळीकर ह्या जज होत्या त्यांच्या समोर गीत गायन केले.
विशेष आठवन-
गायक अनिल उमरे यांच्या गीत गायणावर खुश होऊन एक ख्रीश्चन ग्रहस्त संगीत प्रेमी किजिओ जोशीवा यांनी दोन इन्स्ट्रुमेंट आँर्गन व अँक्टोपँड बक्षीस म्हणुन दिले.हे गृहस्त आठवन आली की फोनवर त्यांचे गीतं ऐकतात. तसेच प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी एक कीबोर्ड दिला .
मनपसंत गीते-
१)भीमरावानी देवावरची प्रेम अलौकिक केले.
२)धम्म दीप हा मानवतेचा.
३)भीमराया घे तुला लेकराची वंदना.
४) जनसागर रडला होता,आकाशही रडले होते.
५)भीमरावा घरी नादाया आली रमा.
अशा प्रकारची एकापेक्षा एक सरस बुद्ध भीम गीतं गाऊन समाज प्रबोधन करतात.
पुरस्कार-
मराठवाडा संगीतरत्न पुरस्कार-परभणी .
संदेश-
समाज व्यसनापासून व अंधश्रद्धेपासून दूर रहावा . समाज एकसंघ व्हावा आपल्या महापुरुषांच्या विचाराने चालावा असा मोलाचा सल्ला ते प्रबोधन करतांना समाजाला देतात.
गायक अनिल उमरे या गुणी कलावंताला एखाद्या शाळेत संगीत शिकवण्याची संधी मिळावी ही मंगलकामना करुन त्यांच्या संगीत क्षेत्रातील व प्रबोधन चळवळीतील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद.!
-आयु.महेंद्र नरवाडे
किनवट जि.नांदेड.मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment