तबला सम्राट बाबुराव संभाजीराव पाटील यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 18 August 2020

तबला सम्राट बाबुराव संभाजीराव पाटील यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडेतबला सम्राट बाबुराव संभाजीराव पाटील यांचा जन्म १ जानेवारी १९६४ साली नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथे झाला. त्यांचे बारावी (कला) पर्यंत शिक्षण झाले.सध्या ते भोकरला राहतात.व्यवसायाने पत्रकार दै.सकाळचे बातमीदार म्हणून काम करतात.विविध कार्यक्रमात तबला आणि ढोलकी वादन,(व्हडरव्हाईस) गायण करतात.

प्रबोधन चळवळीत प्रारंभ-
     वडील डॉ.एस.एस.पाटील हे भजनी मंडळात पहाडी आवाजात बुद्ध भीम गीते गात असत. शासकिय नौकरी सांभाळुन ते गायणकला जोपासत. बाबुराव पाटील हे लहानपणी आपल्या  वडिलांच्या सोबत भजनाला जायचे. फावल्या वेळात वडील घरी गाण्याचा रियाज करायचे त्यावेळी बाबुराव पाटील त्यांना जर्मणचे टोपले, भगोने वाजवुन साथ संगत करायचे.वडील पण थोडंफार वाजवायचे. त्यांच्याकडुन वादन कलेचे बाळकडु मिळाले.त्यामुळे वडील हेच त्यांचे पहिले गुरु. त्यांच्या प्रभावानेअंदाजे पाच ते सहा वर्षाचा लहान असताना वाद्य वाजवण्याचा छंद जडला. त्यांना गाण्याची बिलकुल आवड नव्हती. त्यानंतर त्यांनी तबल्याचे सात वर्ष शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पंडीत त्र्यंबक देशमुख अर्धापुरकर यांच्याकडे घेतले. बाबुराव पाटील मध्यमापूर्ण ही तबल्याची परीक्षा उत्तीर्ण आहेत. नंतर भजन गीतगायण,नाटक, एकपात्री प्रयोग यात भाग घेतला.नांदेड येथील पिपल्स महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना तेथील वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांनी लेडीज आवाजात "हमें तुमसे प्यार कितना ,ये हम नहीं जानते"हे गीत सभागृहात गायले श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तेंव्हापासून ते गातात पण तुरळक प्रमाणात.

व्हडरव्हाईसच गायण का-
      बाबुराव पाटील जेंव्हा एकपात्री प्रयोग करायचे तेंव्हा लेडीजचा आवाज काढायचा प्रसंग यायचा मग तो आवाज त्यांनी सहज काढला.आपण लेडीजच्या आवाजात संवाद काढु शकतो तर गाऊ पण शकतो याची खात्री त्यांना पटली. तेंव्हापासुन ते गीतं अनेक ठिकाणच्या कार्यक्रमात गाऊ लागले. ते उत्कृष्ट तबला वादक आहेत पण त्यांना जी गोष्ट खटकली ती म्हणजे रेडिओ वर जे गाणे गायले जातात त्या गाणा-या कलावंतांचे नाव घेतले जाते पण त्यांना तबल्याची साथसंगत करणा-यांचे नाव कुणीच घेत नसत.त्यामुळे बाबुराव पाटील गाण्याकडे वळले.

स्टेज कार्यक्रम-
   मराठवाडा, खानदेश,विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश,कर्णाटक, मुंबई,पश्र्चिम महाराष्ट्र, हैदराबाद इ.ठिकानी त्यांचे स्टेज कार्यक्रम झाले.

कलावंतांचा सहवास-
  ख्यातनाम गायीका उत्तरा केळकर,अनुपमा पाटील,लक्ष्मी लहाने,भागेश्री देशपांडे, हरबंसकौर, सोनाली,शोभा कदम, गायक कोंडीबा रावळे, पंडीत त्र्यंबक देशमुख,माधव जाधव राजवाडीकर, शाहीर रमेश गीरी,कालवश शाहीर अण्णा चव्हाण, शाहीर ढवळे, पँथर शाहीर आत्माराम साळवे, शाहीर बळीराम हनवते, डॉ.विलासराज भद्रे,प्रा.गणेश नाईक,कालवश नंदकुमार डावरे, बालाजी लामटिळे,प्रमोद गजभारे,संजय गोपाळे,प्रमोद फुलारी, अविनाश भुताळे,शाहीर ललकार बाबु, प्रेमकुमार मस्तके माळाकोळीकर, अनुराधा वाघमारे.

मनपसंत गीते-
१) ऋतुराज तो वसंत आला सृष्टी नवा साज ल्याली,भीमाई गर्भवती राहिली.
२)युगो-युगो तक अमर रहेगा धरती पर त्रिकाल
रामजीका लाल ओ रामजीका लाल.
३)माझ्या मनी प्रीयाची मी तार छेडते.
४)भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते.
५)चंदन वृक्षा समान होता भीमराव झीजला.
     ही गीते जयंती व अन्य कार्यक्रमात बाबुराव पाटील प्रबोधन करतांना आवडीने गातात.

मिळालेला पुरस्कार-
१)ढाणकी ता.उमरखेड (विदर्भ) येथील भीमजयंती निमित्त घेण्यात आलेल्या गीतगायण स्पर्धेत तबला वादन-(द्वितीय पुरस्कार).
२) हिंगोली येथे झालेल्या भीम जयंती निमित्त गीतगायण स्पर्धेत तबलावादन-(प्रथम पुरस्कार).
३) डोंगरकडा येथे भीमजयंती निमित्त ॲानलाईन गीतगायण स्पर्धेत तबला वादन-(तृतीय पुरस्कार).

संदेश-
    कला ही जन्मताच उपजत कला असते तीची मनोभावे सेवा करावी.आपण समाजाचं काही देणं लागतो यांचं भान ठेवावे.समाज सुधारला तरच प्रगती शक्य आहे म्हणून आंतरीक तळमळीने सतत अपेक्षा न करता काम केल्यास फळ नक्कीच मिळते.कलेची पेरणी करतांना त्यात जीव ओतुन काम करीत राहिले तर कलेची कदर होते.कलावंताना पुर्वी चांगला सन्मान व मिळकत होती.आज जमाना बदलला . बदलत्या जमान्याप्रमाणे जगायला शिका.

कलावंताच्या अंगी नम्रता हवी,त्याने व्यसनापासून व अंधश्रद्धेपासून दूर रहावे आपणास अवगत असलेली कला इतरांना शिकवावी तरच कलाकार नावारुपाला येतो.आई वडीलांची सेवा हीच खरी सेवा आहे असा बाबुराव पाटील कलावंतांना व समाजाला संदेश देतात. त्याच्या अविरत कलासाधनेस हार्दिक शुभेच्छा!

-  आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट जि.नांदेड.मो.न.९४२१७६८६५०.

1 comment:

  1. Great & Great personality
    Mr. Baburao Patil sir
    Jaibhim

    ReplyDelete

Pages