[प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत.. संपादक]
भाग - ११.
प्रसिद्ध गीतकार तथा शाहीर दिपक मारोतराव ओंकार यांचा जन्म २फेब्रुवारी १९७२ साली माहुर तालुक्यातील पार्डी मछिंद्र येथे झाला.सध्या शिवाजी नगर ,आंबेडकर चौक, किनवट येथे ते राहतात.मुळात त्यांचा पिंड कार्यकर्त्यांचा. सामाजिक कार्य करीत असतांना लोकसंपर्क वाढला.चळवळीचे काम करतांना ठिक -ठिकाणी भाषणे केली. जयंती, विवाह मेळावे व धम्म परीषद यामध्ये तनमन धनाने उत्साहाने काम केले. धम्म परीषदेतील गायक कलावंतांचे गीतं ऐकुन ऐकून त्यांना गायणाचीआवड निर्माण झाली. बुद्ध, फुले,शाहु , आंबेडकर यांच्या विचाराने समाज परीवर्तन घडते हा ठाम विश्वास वाटला.भाषणा सारखेच गीत गायणातुन प्रभावीपणे समाज प्रबोधन करता येईल या हेतुने गीत गायणाला सुरुवात केली. तशी लहानपणापासूनच गीत गाण्याची आवड होती पण संधी मिळाली नव्हती. नंतर सामाजिक कार्य करीत असतांनाआनेक नामवंत व गाजलेल्या कवी गायकांची प्रेरणा घेऊन गीत गायण हे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम निवडले गावोगावी जाऊन प्रबोधन केले. शाहीर दिपक ओंकार यांच्या संचात तबला- सुभाष उमरे,ढोलकी- प्रकाश येरेकार, हार्मोनियम- माधव धुप्पे,बँजो -अनिल उमरे,रावळे व कोरसला- शंकर गायकवाड,संजय ठोके,बालाजी वाढवे, साहेबराव वाढवे सोबतअसतात.
त्यांचे असंख्य कार्यक्रम खेडोपाडी झाले. किनवट व माहुर परीसरात नागझरी कँप,सिंदगी,मो. कणकी,मांडवी, कोठारी,तांदळा, पवनाळा, वजरा सारखणी,उमरी बाजार, ईस्लापुर,जलधरा, सावरी, बोधडी,चिखली, उनकेश्वर, वाई बाजार, करळगाव, मदनापुर, गोकुळ गोंडेगाव,आष्टा, टाकळी,शेकापुर, पाचोंदा,कुपटी,आंजी,पांगधरा,खंडाळा, पाटोदा, शिवनी, आप्पारावपेठ, मुळझरा, कोसमेट, कोल्हारी, पांगरी,भिसी इ.तसेच इतर तालुक्यातील सरसम,लोहरा, बाळदी, खरुस, नारळी कुरोळी, ढाणकी,बिटरगाव,गांव सावळेश्वर, यवतमाळ मध्ये पारवा, घाटंजी मध्ये तिवसाळा, आर्णी- भानसरा, केळझरा, ताडसावळी, बिलायता, पांढुरणा, अकोला बाजार, सालोड, सदोबा सावळी व केळापुर इत्यादी ठिकाणी महापुरुषांच्या विचारांची पेरणी प्रबोधनपर कार्यक्रमाने केली.
नामवंत गायक कलावंतांसोबत कार्यक्रम-
वैशाली शिंदे, मैना कोकाटे, चंद्रकला गायकवाड, सुमन चोपडे, सुमन भगत, संगीता गायकवाड, वंदना खोब्रागडे, अंजली भारती, प्रतिक्षा नारळे, विशाखा राऊत, आश्वीनी राजगुरु, ललकार बाबु, डॉ.संतोष वाठोरे, चंद्रकांत धोटे, ईंचेकर, कैलास राऊत, संदीप राजा, शाहीर काशिनाथ भवरे, नरेंद्र दोराटे यांच्या समवेत गीत गायन केले.
शासकीय योजना समंधी जनजागृती-
पाणलोट क्षेत्र,पर्यावरण,बेटी बचाव,बेटी पढाव,लेक शिकवा लेक वाचवा अभियान ईत्यादी शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जन प्रबोधन केले.
गर्जे जयभीमचे संस्थापक अध्यक्ष, परिवर्तन कलामंच, जिल्हा अध्यक्ष, बहूजन समाज पार्टी चे तालुका अध्यक्ष या नात्याने सामाजिक कार्यकर्ता म्हणून तालुक्यात उल्लेखनिय कार्य करुन स्वतःचं एक स्थान निर्माण केले.
प्रकाशित गीत संग्रह-
१)गर्जे जयभीम भाग- १
२) गर्जे जयभीम भाग -२
मनपसंत गीते-
१) तळागाळातील बहुजनांना देऊनी आधार,आमचा केला भीमाने उद्धार.
२)भीम माऊलीच्या पदी लीन व्हावे.
३)पुढे पुढे जातो,लीडरकी करतो.
४)पुढा-यानो,नेत्यानो,न्याय नीतीने वागा.
५)रमाई ने कठीन दिवस काढीले.
अशा प्रकारची एकापेक्षा एक सरस गाणी लिहुनआपल्या पहाडी आवाजात भीमशाहीर दिपक ओंकार यांनी सादर केली.
पुरस्कार-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, छ्त्रपती शाहु महाराज सन्मान, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार,श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य पुरस्कार,देवी अहिल्याबाई होळकर सामाजिक एकता पुरस्कार, मराठवाडा संगीतरत्न पुरस्कार,इत्यादी.
संदेश-
समाजाने एकीनं रहावं.येणा-या कालावधीत अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारुन सत्ता संपादन करावी .हा मोलाचा सल्ला शाहीर दिपक ओंकार आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून देतात . त्यांच्या गर्जे जयभीम या संस्थचे प्रबोधनाचे कार्य अजून जोमाने सुरू होवो ही मंगलकामना करून शुभेच्छा देतो.धन्यवाद.!
- आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट, जिल्हा नांदेड.
मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment