प्रसिद्ध गायक गौतम नागोराव शेळके यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 August 2020

प्रसिद्ध गायक गौतम नागोराव शेळके यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडे


[प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती  ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत.. संपादक]
भाग - १३.

    प्रसिद्ध गायक गौतम नागोराव शेळके यांचा जन्म२फेब्रुवारी१९७८साली किनवट तालुक्यातील आंजी या गावी झाला. सध्या ठाणे(मुंबई) येथे खाजगी क्षेत्रात नौकरी करतात. आई वडील आंजी येथेच काबाडकष्ट करत पण कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होत. संगीताचा आई वडिलांना काही गंध नव्हता. गौतम शेळके यांनी प्रार्थमिक शाळेत आंजी येथे कवीता स्वरबद्ध करुन गायल्या,भाषणे केली, एकपात्री अभिनय केला हे करत करत गीत गायणाची आवड निर्माण झाली. मोहपुर येथील केंद्रीय शाळेत गीत गायन स्पर्धेत बक्षीस मिळाले. अंबाडी येथील धम्ममेळाव्यात आयोजित गीतगायण स्पर्धेत ही बक्षीस मिळाले.

गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात  माझ्या बरोबर गीतमंच कार्यक्रमात मी गीतं सादर करतांना गौतमने तबला साथ केली. गौतम शेळके यांचे मामा सोमाजी धर्माजी कांबळे हे त्याकाळी ग्रामीण भागातील सर्वांना परिचित असलेले गीतकार व गायक भीम संदेश गीतमाला हे त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे.त्यांनी संगीत कला शिकवीली. त्यांची प्रेरणा मिळाली . तेच खरे गुरु आहेत असे गौतम सांगतात. सध्या ते तबला, ढोल व हार्मोनियम उत्तम वाजवतात.गावखेड्यापासुन ते मोठमोठ्या शहरांमध्ये भीम जयंती, बुद्ध जयंती, महापरीनिर्वाण दिन, गृहप्रवेश, लग्नसमारंभ, या शिवाय हुंडाबंदी, दारुबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन इ.कार्यक्रमात तसेच कोरोणा या महामारी बाबत मी लिहलेले गीत गौतमने स्वरबद्ध करुन समाज प्रबोधन केले व स्वत:चे उत्कृष्ट गायक म्हणुन स्थान निर्माण केले.

सहवास-
सन्मानिय चंद्रमुनी गाडगे हे कोकन समाज रत्न पुरस्कार प्राप्त आहेत यांच्या अंतर्गत महाड तालुका मनंदगड येथे कार्यक्रम चालू असताना फरमाईश प्रमाने रमाबाई आंबेडकर यांच्या वडीलाचे गाव वनंद या गावचे कवी जनार्धन धोत्रे यांचे गीत''कधीना कधी या बहीनीची आठवण होईल,जेंव्हा ढवळ्या पवळ्याची खिल्लारी जोडी जुंपुन गाडी तेंव्हा बंधुराज येईल गं | गायले या गीतांचे कवी,प्रोत्साहित करणारे संतोष घाडगे,रेष्मा सोनवने, प्रतापसिंग बोधडे यांचा सहवास लाभला.

गायक कलावंता बरोबर गायण-
शाहीर बळीराम हनवते, साहेबराव येरेकार, चंद्रकांत धोटे,विष्णु धुळे,माधव धुप्पे,सोमाजी घुले,सोमाजी कांबळे, गंगाराम मुनेश्वर, महेंद्र नरवाडे, सिद्धार्थ कांबळे,वसंत दामोधर, नरेंद्र दोराटे,जलपत शाहीर, बाबुराव गाडेकर,माधव वाढवे,गौतम पवार,रमेश दवने,मनोजराजा गोसावी,भारत पडघणे,भगवान क-हाळे,बबन जोंधळे,गौतम नरवाडे, बुद्धघोष ढगे,रत्नाकर धोटे, सुभाष बनसोड,संजय गायकवाड, मिलिंद कांबळे,विष्णु शिंदे, राहुल शिंदे,सुषमा देवी,सुशीला पुणेकर,कवीता पुणेकर,रमा कांबळे,सविता कांबळे,अंजली भारती,उमा भारती, वैशाली शिंदे,अंजली घोडगे,प्रज्ञा इंगळे,ज्योती शिंदे,संतोष घाडगे,राहुल मुश्के,विजय उबाळे या गायक कलावंता बरोबर गायणाची संधी मिळाली.

विविध ठिकाणी कार्यक्रम-
किनवट, अंबाडी, इस्लापुर, बोधडी, उमरी, माहुर, उनकेश्वर,मोहपुर,कुपटी,साकुर, सिंदगी,डोंगरगाव, बोरगाव, चिंचोली,पडसा,वरुडी,सवना, हिवरा, महागाव, फुलसावंगी, ढाणकी, मुळावा, विडुळ, शेंबाळपिंपरी, खरबी, दराटी,थेरडी, आदिलाबाद, गुडेहातणुर, भोसी, इंद्रावली, हिमायतनगर, पेंडी पोखरी,वाजेगाव,मांडवा,कळमनुरी,हिंगोली, औरंगाबाद, पुणे, परभणी, धर्माबाद , उमरखेड , पुसद, वाशीम, यवतमाळ वर्धा, पुर्णा, उमरी स्टे.ठाणे, घाटकोपर, भाईंदर, दादर हवेली, भांडुप, मुलुंड,घोडबंदर, मानपाडा, माजीवाडा, पनवेल,रत्नागीरी, महाड, राजापुर, वाकन, औसा, नाशिक, इगतपुरी, मनंदगड, कोल्हापुर, सांगली, सातारा इ. ठीकाणी दिड हजारांहून अधिक कार्यक्रम केले.

सन्मान -
१)किनवट तालुक्यातील साक्षरता अभियानात ३० कार्यक्रम केल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सुधीरकुमार गोयल साहेब यांच्या हस्ते गौरव.
२) लोककलावंत सांस्कृतिक विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष,३) समृद्धी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सचिव म्हणुन कार्यरत.या संस्थेअंतर्गत संस्थेच्या वर्धापण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५वी शतकोत्तर जयंती साजरी करण्यात आली.व इतर कार्यक्रम शासकिय, वैद्यकीय, आर्थीक, सामाजिक, पर्यावरण, रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर कंँसरग्रस्ताना आर्थिक मदत, आर्थिक दुर्बलांना आय.सी.यु. स्टेटमेंटसाठी मदतकरणे, स्वच्छता अभियान यावर आधारीत जनजागृती पर कार्यक्रम सादर केल्यामुळे संस्थाअध्यक्ष कैलास पाईकराव व नगरसेवक ओवळा ठाणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान.

मनपसंत गीते-
१)भीमरायाचा ज्ञान खजीना जगात भारी भरला|
कोलंबिया विद्यापीठात माझा भीम एक नंबर ठरला||
२)आई तुला भेटावयास आला तुझा भिवा|
बघ एक नजर बँरिस्टर झाला तुझा भिवा||
३)गरीबीत कसे शिकावे,शिकवीले भीमाने|
गरीबीत कसे जगावे ,शिकवीले रमाने||
४) तुझ्या चळवळीला पुढे कोण नेईल|
तुझ्या विचारांचे धडे कोण देईल||
५)रहावयास बंगला गाडी,बायकोला पैठणी साडी|
भिमाच्या या पुण्याईने फिराया लाल दिव्याची गाडी||अशी एकापेक्षा एक सरस गाणी गायक गौतम शेळके गाऊन समाज प्रबोधन करतात.

संदेश-
धम्म चळवळ गतिमान करा,दर रवीवारी विहारात जा,संघटना मजबुत बांधा , सदाचारी जीवन जगा असा संदेश प्रबोधनपर गीतगायणातुन ते देतात.
गायक गौतम नागोराव शेळके यांचा प्रबोधन चळवळीतील प्रवास आजुन गतीमान होवो ही मंगल भावना व्यक्त करुन शुभेच्छा देतो . धन्यवाद.!

 - आयु.महेंद्र नरवाडे, किनवट जि.नांदेड.मो.नं.९४२१७६८६५०

No comments:

Post a Comment

Pages