गायक रामदास मारोती पारडे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 16 August 2020

गायक रामदास मारोती पारडे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडे



अंतिम भाग..

       रामदास मारोती पारडे यांचा जन्म २ मार्च १९८० साली हदगाव तालुक्यातील ल्याहरी या गावी झाला.त्यांचे शिक्षण १०वी पर्यंत झाले.
  ल्याहरी हे हदगाव तालुक्यातील प्रबोधन चळवळीतील  महत्त्वाचे गाव आहे.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील निळी टोपी घातलेले सिंगणकर मी लहान पणी पाहीले.येथे  आयु.पांडुरंग वाठोरे दरवर्षी १४जानेवारीला धम्ममेळावा आयोजित करतात. मोठमोठे विचारवंत व नामवंत गायक-गायीका येथे येतात. तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रबोधन दरवर्षीच होत असल्याने गायक रामदास पारडे यांच्या वर प्रभाव पडला यातुन त्यांना भजन व नाटकाची आवड निर्माण झाली.गावातील भजनी मंडळात ते गौतम सावतकर, विनायक सावतकर,काशिनाथ सिंगणकर,गणेश सावतकर यांच्या सोबत ते गीतं गाऊ लागले हळूहळू त्यांनी यात प्रगती केली.गायणकला अवगत केल्यावर त्यांनी पहिले.

"मर्द भीमाचा मैदानी मर तू गड्या हे गीत लिहले आणि गायले नंतर निखारा नावाने १९९७ला पहिला गीत संग्रह प्रकाशित केला.नंतर याच पुस्तकातील गाण्यांचे  निखारा या सि.डी.मध्ये रुपांतर केले.सि.डी.तील गीतं स्वत: गायले आहेत. संगीत चरण जमदाडे, पंडीत मुनेश्वर,उत्तम रावळे यांनी दिले.त्यांचा आवडता गीतकार तथा गायक मनोजराजा गोसावी असुन त्यांची शेरोशायरी प्रबोधन करतांना ते गातात.

नामवंत गायक कलावंतांसोबत कार्यक्रम-
त्यांचा पहिला कार्यक्रम शाहीर चंद्रकांत धोटे यांच्या सोबत हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे झाला.नंतर धम्मदिक्षा लातुरकर,अंजली घोडगे, सुनिता किर्तने,सिमा खंडागळे, वैशाली गरडे,सुजाता भगत इ.सोबत कार्यक्रम झाले.

धम्म परिषदेत प्रबोधन-
बावरीनगर दाभड जि.नांदेड, लहान लोन,येलकी फाटा,कारखेड फाटा ता.उमरखेड येथील धम्म परिषदेमध्ये प्रबोधन केले.त्यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जग बदल घालुनी गाव सांगुनी गेले मज भीमराव या गाण्यातील परिवर्तनवादी विचार स्विकारला .गावातील अण्णाभाऊ साठे जयंती व लहुजी साळवे जयंती तालुक्यातील कुठेही जयंती असो की धम्म परिषद असो तेथे रामदास पारडे विना विलंब जाऊन कार्यक्रम करतात. लाकडाउनच्या काळात ही सोसियल मिडियावर  ॲानलाईन कार्यक्रम केले.कार्यक्रमात संगीत साथ संतोष धुळे,पुराण पठाण,खाजामियाँ,सोनु गरडे, सचिन कांबळे,सिद्धु कवडे,धम्मा वावळे,उत्तम रावळे, रमेश जमदाडे, समाधान राऊत, तथागत राऊत,धम्मदीप जाधवव पत्नी रुख्मीनी पारडे यांची असते.त्यांच्या मुलीवरही त्यांनी उत्तम संस्कार केले आहेत  माता रमाई व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यावर परीसरातील अनेक धम्मपरिषदेत ठणकावून भाषन करते.हरडप येथे ही धम्म मेळाव्यात तिने माता रमाई वर सुंदर भाषण केले होते श्रोत्यांनीअक्षरश: बक्षिसांचा वर्षाव केला.मी  रामदास पारडे व मान्यवर स्टेज वर होतो.

मनपसंत गीते-
१)मनोजराजा गोसावी यांचे-डोक्यात घ्या मला.
२)थांब रमा थांब एवढे वाचुदे गं पान.
३)तुझ्या पाऊलखुणा भीमराया.
४)स्वत:चे गीत-नको अर्ध्यात जाऊ रमा मला सोडून.
५)मर्द भीमाचा मैदानी मर तू गड्या.

संदेश-
बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवर्तनवादी विचार स्विकारला पाहिजे.समाज शिक्षित झाला पाहिजे,अज्ञान व अंधश्रद्धेतुन  मुक्त झाला पाहिजे असा संदेश रामदास पारडे आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून देतात.त्यांच्या प्रगतीशील प्रबोधन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.धन्यवाद.

- महेंद्र नरवाडे, किनवट

No comments:

Post a Comment

Pages