VBA वतीने प्रवेशप्रक्रिया मदत केंद्राची स्थापना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 17 August 2020

VBA वतीने प्रवेशप्रक्रिया मदत केंद्राची स्थापना
मुंबई : आद.बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वबआ. चे राज्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या हस्ते VBA मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्वप्निल जवळगेकर,स्नेहल सोहनी,हर्षा,अमोल पगारे,कमलेश उबाळे,प्रेरणा काळे,प्रशांत काबळे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

अकरावी ऑनलाईन प्रवेश सुरु झाला असून राज्यात लॉकडाऊन असल्याने विद्यार्थाना अडचण होत आहे. विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्याच्या माहितीसाठी ऑनलाइन मदत केंद्र सुरू केले आहे. परंतु प्रत्यक्षात ही मदत केंद्रे नावालाच असल्याचे दिसून आली आहेत. याकडे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे वंचित घटकातील पालक हे सुज्ञान पालकांची मदत घेऊन नेटकॅफे किंवा अन्यत्र ऑनलाइन अर्ज भरत आहेत. परंतु इंटरनेटची गती कमी आदी कारणामुळे तेथे वेळेत काम होत नाही. शिवाय नेट- कॅफे मधून अतिरिक्त पैसे आकारून विद्यार्थी व पालकांची लूटमार केली जाते. त्यामुळे आर्थिक भुर्दंडालाही सामोरे जावे लागते. अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरला पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पालकही जादा पैसे देऊन फॉर्म भरून घेतात.

विद्यार्थी व पालकांवरील हा ताण कमी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश फॉर्म भरून देण्याकरीता मदत केंद्र चालू करण्यात आले आहे. या मदत केंद्रावर आपल्या पाल्यासोबत जाऊन विद्यार्थी मोफत फॉर्म भरू शकतात. तसेच प्रवेश प्रक्रिये बाबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून माहितीही घेऊ शकता.


प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र

मुंबई विभाग

स्नेहल सोहनी : 9967632547
स्वप्निल जवळगेकर : 8286258933

ठाणे विभाग

हर्षद बोले 9004664761
कमलेश उबाळे 9768276400
रोहित डोळस 8082061994

No comments:

Post a Comment

Pages