किनवट ,दि.१७ :किनवट-माहूर या रस्त्यावरील घोटी गावाजवळील नाल्यावरील तात्पुरता करण्यात आलेला वळण रस्ता आज(.१७)दुपारी तीनच्या सुमारास दुस-यांदा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.यामुळे घोटी नाल्याला आज पूर येउन नाल्यावरील वळन रस्ता वाहून गेला आहे.यामुळे या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे,तसेच अनेक गावांचा संपर्क ही तुटला आहे.
मागील वर्षांपासून या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम मोरगे कंस्ट्रकशन कंपनिकडून संथ गतीने सुरु आहे.यातच ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कंपनीने घोटी नाल्यावरील जुना पूल तोडून नव्या पूलाचे बांधकाम सुरु केले आहे.यासाठी कंपनीने पर्यायी वाहतूकीसाठी कच्चा वळण रस्ता तयार केला.हा रस्ता ही यापुर्वि एकदा वाहून गेला होता.
तेंव्हा जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी भेट देऊन लवकरात लवकर वळण रस्ता तयार करुन वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते.तेंव्हा कांहीं दिवसांनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला होता.मोरगे बांधकाम कंपनिला मोठा राजकीय वरदहस्त असल्याने या कंपनिच्या कितिही तक्रारि केल्यातर त्याला कचरा कुंडी दाखविण्यात येते,असे अनेक जागृत नागरिकांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment