प्रबोधनकार श्रीपती लक्ष्मण ढोले यांचा जन्म ४ डिसेंबर१९६५ साली हदगाव तालुक्यातील रावनगाव येथे झाला.त्यांचे शिक्षण बी.ए.डी.एड.पर्यंत झाले असुन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नांदेड येथील नागसेन विद्यालयात सहशिक्षक म्हणुन कार्यरत आहेत.
श्रीपती ढोले यांचे वडील लक्ष्मण ढोले भजनी मंडळात पखवाज वाजवत व आई रोज पहाटे ४वाजता श्रीपती यांचे डोके आपल्या मांडीवर ठेवून दळन दळतांना तथागत गौतम बुद्ध , डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माहेरचे वर्णन असलेल्या ओव्या गात असत.गायण कलेचा वारसा त्यांना बालपणी घरातच मिळाला.श्रीपती ढोले यांच्यासह बहिनी पौर्णिमा, संघमित्रा,विद्या व भाऊ बाबासाहेब ढोले या सर्वांचा आवाज छान.सर्वांनाच गाण्याची आवड आहे.पुढे चातारी येथे शिकत असतांना त्यांनी वसतीगृहात छान गीत गायले. हरडप व रावनगाव येथील आम्ही सर्व त्यांचे रसिक खुप कौतुक वाटायचं गावातील भजनी मंडळात ही श्रीपती ढोले गीत गाण्यासाठी जात असत.नंतर डी.एड.झाल्यावर नागसेन विद्यालयात शिक्षक झाले . आपल्या कलेचा अध्यापन कार्यात वापर करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत परीपाठात हार्मोनियम सह वंदन गीत "भीमराया घे तुला ह्या लेकरांची वंदना"हे गीत सादर करत त्यामुळे संगीत सादरीकरणातुन परीसरात ओळख निर्माण झाली.नंतर स्वत:चा संच तयार करुन जयंतीच्या कार्यक्रमासाठी गावोगावी जाऊन बुद्ध भीम गीते सादर करीत करीत प्रबोधन चळवळीत स्वत:चे स्थान निर्माण केले.
संगीत साथ-
तबलावादक-उत्तम चावरे, हार्मोनियम-मोहन लांडगे,बँजो-देवानंद धुळधुळे,कोरस-कल्याण डोणेराव,प्रल्हाद चौरे यांच्या संगीत साथीने प्रबोधन करतात.
नामवंत गायक कलावंतांसोबत कार्यक्रम..
वामनदादा कर्डक, प्रतापसिंग बोदडे, नागसेन दादा सावदेकर या नामवंत गायका सोबत त्यांचे कार्यक्रम झाले.
त्यांनी सुंदर गीतलेखन ही केले आहे.श्रोत्यांच्या प्रतिसादानुसार ते गीतं सादर करतात.त्यांनी बुद्ध विहार निर्मीती,धम्म परीषदा, कलावंतांचीआंबेडकरी जलसा परीषद आदी कार्यात स्वत: भाग घेतला.
राजगृहाकडे चला..
या प्रकल्पा समंधी नांदेड मुक्कामी असताना श्रीपती ढोले यांनी आद.बाळासाहेब ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली व त्यांचा आशीर्वाद घेतला.त्यानंतर आंबेडकरी जलसा परिषदेच्या निमित्ताने सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांच्याशी डॉ.आंबेडकर भवन दादर येथे चर्चा केली.रिपब्लीकनसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्वच जिल्ह्यांत व आंध्रप्रदेशात काही जिल्ह्यात मा.आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत जाऊन भाषणे केली व गीतगायणातुन जनप्रबोधन केले.आंबेडकरी समाजाचे प्रबोधन करण्याची त्यांना दिशा मिळाली.यासाठी त्यांनी प्रबोधनपर गीतं लिहिली व कार्यक्रमात सादर केली. संस्था भीमाच्या,घरांने भीमाचे, राजगृहाकडे चला अभियान हे जनजागृती अभियान राबवून जनप्रबोधन केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था संघटना राजगृहाच्या म्हणजेच आंबेडकर कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी त्यांनी करत असलेले कार्य ही बहुमोलाचे आहे.सध्या रिपब्लिकन सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेचे निष्ठेने काम करतात.
संदेश..
समाजातील ज्या कार्यकर्त्यात जो हुन्नर आहे त्यांने तो हुन्नर राजगृहाभोवती समाज संघटित करण्यासाठी वापरावा, समाज संघटित करावा आणि सत्ता संपादन करावी हा संदेश आपल्या कार्यातुन व प्रबोधनपर कार्यक्रमातुन श्रीपती ढोले समाजाला देतात. त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद.!
- आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट जि.नांदेड.मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment