प्रसिद्ध गायिका विशाखा कैलास राऊत यांचा जन्म१जुलै१९६९साली कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथे झाला.त्यांचे शिक्षण अमरावती विद्यापीठातुन अर्थशास्त्र या विषयात एम.ए.पर्यंत झाले.सध्या हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथे अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे वडील कालवश रामा पाईकराव सुप्रसिद्ध ढोलक वादक होते. त्यांच्या माहेरी आठराविश्व दारिद्र्य .पोटाला भाकर मिळायची नाही.आई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं गाणं गाऊन पोटापुरती भाकर कशीबशी मिळवायची.भुकेच्या आगीनं मग विशाखालाही गीत गाण्याची आवड निर्माण झाली.तशीच शिक्षणाची ओढ लागली.पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे दहावी पर्यंत शिक्षण घेतले.नंतर माय लेकी दोघीही गावोगावी जाऊन बुद्ध भीम गीते गात असत.यातुन जे पैशे मिळत त्याने घरखर्च भागत असे.
उभरती गायिका विशाखा यांचा विवाह१९९५ साली विद्रोही शाहीर कैलास राऊत यांच्याशी झाला.एका शाहीराला जोडीदार गायिका मिळाली.
विशाखाताई यांना कालवश गुरुवर्य कवीरत्न को.जो.नरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
उच्च शिक्षण घेऊन आपल्या घरातच त्यांनी आपला संच तयार करुन प्रबोधन कार्याला जोमाने सुरवात केली.तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतीकारी कार्य व रमाईचा त्याग हे सारं कार्य विविध ठिकाणच्या कार्यक्रमात गीतं गाऊन प्रबोधन करत आहेत.आजवर अनेक गायिका या गायण क्षेत्रात आल्या नामवंत झाल्या.त्यांच्याप्रमाने विशाखा कैलास राऊत ह्याही आज संपुर्ण महाराष्ट्रात गायिका विशाखाताई नांदेडकर म्हणुन प्रसिध्द आहेत.सध्या नागसेन नगर , हदगाव येथे त्या राहतात.
त्यांचे प्रबोधनपर कार्यक्रम महाराष्ट्रातील नांदेड ,मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे तसेच आंध्रप्रदेशात ही दिग्गज कलावंता सोबत अनेक ठिकाणी झाले.हदगाव येथे सातत्याने चालु असलेल्या धम्म परिषदेतही त्या सक्रिय सहभाग घेऊन प्रबोधन करतात.नांदेड आकाशवाणी केंद्रावर त्यांनी तीन वेळा प्रबोधनपर गीतं गायली.त्यांनी स्रीभ्रुणहत्या, अंधश्रद्धा, कुटुंब नियोजन, दारुबंदी, हुंडाबळी अशा अनेक विषयांवर गाणी गाऊन समाज प्रबोधन केले.त्यांच्या सोबत शाहीर कैलास राऊत यांच्यासह संचात त्यांची दोन मुले बँजोवादक -तथागत राऊत,तबला सम्राट -समाधान राऊत, आणि ढोलक वादक -जयपाल जमधाडे, हार्मोनियम -अमोल भवरे,संजय कदम,अरुण कदम हे संगीत साथीला असतात.
विशाखा राऊत ह्या अर्थ शास्त्रात एम .ए. असल्याने त्यांनी महीलांच्या सबलीकरणासाठी हदगाव तालुक्यातील गावोगावी जाऊन महिलांचे बचत गट स्थापन करुन त्यांना विनामुल्य मार्गदर्शन केले.
मनपसंत गीते-
१)मेणबत्ती परी ग रमा जीवनाला जाळीलेस तू.
२)मला रमानं बसविलं सोन्याच्या ताटी.
३)ज्या हातानं काढलं शेनं
त्या हातात आली पेनं.
४)नको गर्भात मारु,
मला जन्माला घाल.
५)नातू भीमाचा, माता रमाचा,
एकच नाव आहे ओठांवर,
बाबा नंतर ,नेता खरोखर ,
प्रकाश आंबेडकर.
पुरस्कार-
बहुजन टायगर प्रतिष्ठान च्या वतीने २०१८साली "भीमकन्या"पुरस्कार प्राप्त.
संदेश-
बहुजन समाजातील सर्व घटकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवर्तनवादी विचार आत्मसात करुन स्वत:ची उन्नती करावी.संविधाने तुम्हाआम्हाला अधिकार दिले त्या संविधानाला जपावं.सम्राट अशोक यांचा भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी जागृत रहावं असा मौलिक संदेश प्रसिद्ध गायिका विशाखा राऊत नांदेडकर प्रबोधन करतांना देतात.प्रबोधन क्षेत्रातील त्यांच्या प्रगतीशील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद. !
आयु.महेंद्र नरवाडे,किनवट जि.नांदेड.मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment