मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात आता रिपब्लिकन पक्षाला उज्ज्वल भवितव्य राहिलेले नाही, असे परखड मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. रिपब्लिक ऐक्य हा विषय मागे पडत चालला असून कार्यकर्ते इतर पक्षात जाऊ लागले आहेत, अशी कबुलीही त्यांनी दिली.
ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा निवडणुकीत पराभाव झाल्यावर नेत्यांनी एकत्र यावे असा जनतेतून दबाव यायचा. आता तसा दबाव नसतो. याउलट कार्यकर्तेही पक्ष सोडून जातात. रिपब्लिकन ऐक्य हा विषय मागे पडत चालला असला तरी माझी ऐक्यासाठी तयारी असते. पण प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्याला अर्थ प्राप्त होत नाही, असं म्हणत आठवलेंनी ऐक्याची तयारी दाखवली आहे.
No comments:
Post a Comment