नेवापुर प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून अ‍ॅट्रॉसीटी कायद्यानुसार कारवाई करा. आंबेडकरी कार्यकर्त्यांची मागणी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सिंघल यांना भेटून मागणी करण्यात आली. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 September 2020

नेवापुर प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून अ‍ॅट्रॉसीटी कायद्यानुसार कारवाई करा. आंबेडकरी कार्यकर्त्यांची मागणी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सिंघल यांना भेटून मागणी करण्यात आली.

औरंगाबाद प्रतिनिधी:

आज दि.८ सप्टेंबर रोजी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सिंघल यांना प्रत्यक्ष भेटून नेवपूर येथील घटनेबाबत निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनात नेवपूर(खालसा) ता कन्नड जि. औरंगाबाद येथे गावातील बौद्ध समाजाच्या वतीने चौकात लावण्यात आलेला धम्म चक्रांकित निळा ध्वज गावातील सवर्ण समाजाकडून तोडून टाकण्यात आला यास विरोध करणाऱ्या सुमारे 30 ते 40 महिला,पुरुष व वृद्धावर गाव गुंडाकडून सशस्त्र हल्ला करण्यात आला ह्या प्रकरणी मोठा पोलिसांनी फौज फाटा तैनात केला असताना पोलिसासमक्ष हा प्रकार घडत असताना पोलिसांना जाब विचारणाऱ्या महिला व युवकांवर पोलिसांनी जबर लाठीचार्ज केल्याची घटना घडल्याने आंबेडकरी समाजामध्ये संताप व्यक्त होत आहे.
ह्या ठिकाणी निळा झेंडा असल्याने सामाजिक तेढ निर्माण होत असल्याचा संतापजनक खुलासा पोलिसांनी केला आहे ह्याच रस्त्यावर काही फूट अंतरावरच भगवा झेंडा असताना केवळ निळ्या झेंड्याचा विरोध करून पोलिसांनी,तहसील कार्यालय कर्मचारी व गावातील गुंड व जातीयवादी मंडळींनि संगनमत करून गावातील बौद्ध समाजात दहशत निर्माण केली असल्याने सदरच्या प्रकरणी
१) सर्व दोषी अधिकारी,पोलीस अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ करावे.
२) सर्व दोषी अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे
३) गावगुंडावर अ‍ॅट्रॉसीटी कायद्यानुसार कारवाई करावी ह्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
ह्या हल्ल्यात सुमारे 30 ते 40 महिला-पुरुष-तरुण मुले-मुली वृद्ध हे जखमी झाले असून पैकी 3 रुग्णांना गंभीर दुखापतीमुळे घाटी रुग्णालय येथे हलविण्यात आले असून उर्वरित नागरिकांवर पिशोर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
राज्य भरात दलित अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना औरंगाबाद जिल्ह्यात देखील गंभीर घटना घडल्या असताना पोलिसच जर कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून गुंडाच्या जातीयवादी मंडळींसोबत संगनमत करून अनुसूचित जाती-जमाती व दलितांवर हल्ले करत असतील तर पोलीस प्रशासनावर विश्वास कसा ठेवावा हा प्रकार पोलीस प्रशासनाला काळ फासणारा असल्याने तातडीने कारवाई करावी अन्यथा ह्या विरोधात ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिष्टमंडळात जेष्ठ नेते दिनकर ओंकार,रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम,भीम आर्मीचे बलराज दाभाडे,बाळू वाघमारे,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे,अ‍ॅड.अतुल कांबळे,निखिल खरात आदींचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

Pages