औरंगाबाद प्रतिनिधी:
आज दुपारी 12 च्या सुमारास आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा पोलिस अतिरिक्त अधीक्षक गणेश गावंडे यांना भेटून जिल्हातील दलित अत्याचाराप्रकरणी ठोस कारवाई करावी अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरले असा इशारा देत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मागील 7-8 महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तालुक्यात दलित अत्याचाराचे प्रकार वाढले असल्याने पोलिसांचा यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिला नाही, आंबेडकरी समाजाला संरक्षण देण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले असून बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विरोधात आंबेडकरी जनतेत असंतोष दिसून आला आहे.शिवाय राज्यातही मोठ्या प्रमाणात दलित अत्याचाराचे प्रकार वाढले असल्याने ह्या विरोधात सरकारला जागे करण्यासाठी लवकरच भव्य मोर्चा काढून शासन व पोलिसांच्या नाकर्ते पनाचा विरोध करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलिसांनी पुढे येत ह्या अन्यायाविरुद्ध ठोस कारवाई करावी,नेवपूर येथील झेंड्याचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसानी बौद्ध नागरिकांना बेदम मारहाण केली ह्यात पोलीस बळाचा गैरवापर केला असल्याने पोलिसी अत्याचार तात्काळ थांबवावा,नेवपूर प्रकरणात दोषी पोलीस उपअधीक्षक जगदीश सातव,पोलीस उपनिरीक्षक जगदीश पवार यांचेवर कारवाई करावी,नेवपूर येथे सन्मानाने निळा ध्वज पुन्हा लावण्यात यावा,पोलिसांच्या दिरंगाई मुळे लाख खंडाळा,वैजापूर येथे भीमराज जगताप खून झाल्याने पोलीस निरीक्षक श्री अनंत कुलकर्णी,पोलीस उपअधीक्षक गोपाल रंजणकर यांच्या वर कायदेशीर कारवाई करावी,शहर पळशी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याऱ्या समाज कंटकावर कारवाई व्हावी,जिल्हातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्या च्या परिसरात विद्यूत रोषणाई करून ,सी सी टी व्ही लावण्यात यावे अश्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment