कोल्हापूर प्रतिनिधी:
कॉरोना आणि लॉकडाऊन मुळे लोकांचं जगणं असह्य झाले असताना अशातच अनेक शिक्षणसंस्था,महाविद्यालये मुलांच्याकडून भरमसाठ शुल्क आकारणी करत आहेत याविरोधात आवाज उठवत गेल्या संबंधित विभागांना पाठपुरावा केल्यानंतर अखेर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी महाविद्यालयांना सक्त आदेश देत परिपत्रक जारी केले आहे सोबतच शिक्षण सहसंचालक यांनी देखील सदरच्या बाबीची दाखल घेत उचित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी संघटनेने केलेले काम प्रशंसनीय व अनेक विध्यार्थ्यांच्या हिताचे आहे असे सांगून विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच महाविद्यालयाना यासंबंधी सक्त आदेश दिले जातील असे कळवले आहे.
मा.सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत सर यांनी याबाबतीत तत्परता दाखवत कारवाई सुरु केली आहे.कोणतेही महाविद्यालय अशा प्रकारची शुल्क आकारणी करत असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांनी त्वरित कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. काल शिक्षण सहसंचालक,कुलसचिव शिवाजी विद्यापीठ व सहाय्यक आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून वंचित युवा आघाडी व आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन यांनी निवेदन सादर केले.यावेळी संदीप कांबळे(वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा उपाध्यक्ष),बुद्धभूषण कांबळे(कार्याध्यक्ष,आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन) वैभव कांबळे(तालुकाध्यक्ष) अर्जुन कांबळे(कार्यकर्ते-सम्यक विध्यार्थी आंदोलन) उल्हास कुरणे व सुयश कांबळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment