केळी पिकाच्या संरक्षणासाठी कृषि कार्यालयाचा संदेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 21 September 2020

केळी पिकाच्या संरक्षणासाठी कृषि कार्यालयाचा संदेश

नांदेड,  दि. 21 :- अर्धापूर व मुदखेड तालुक्यात केळी पिकावर किड व रोगाच्या नियंत्रणासाठी  संक्रमीत झाडे ताबडतोब उपटून नष्ट करावीत. शोषक किटकांना नियंत्रित करण्यासाठी पिवळा चिकट टेपचा वापरा करावा. शेताची स्वच्छता करण्यात यावी. शेताच्या बाहेरुन येणारी किटक नियंत्रित करण्यात यावेत. शोषक किड नियंत्रणासाठी रसायनांचा वापर करावा. ॲसिटामिप्रिड 6 ग्रॅम किंवा इमिडाक्लो प्रिड 8 मिली किंवा फिप्रोनिल 20 मिली अधिक ॲसेफेट 15 ग्रॅम) सोबत स्टिकरचा वापर करावा, असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages