औरंगाबाद ,प्रतिनिधी:
आज आंबेडकरी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा वाढदिवस 'फेकू दिवस' म्हणून साजरा केला गेला.
मागील 6 वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मोदी सरकारच्या घोषणा फसव्या असून देशाला अधोगतीला नेणाऱ्या असल्याचा आरोप केला.
मोदींचा अच्छे दिन चा फुगा फुटला असल्याने मोदींच्या खोटेपणा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 च्या सुमारास 'अच्छे दिन' चे फुगे फोडण्यात आले.
यावेळी मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख असलेले काळ्या रंगाचे फुगे फोडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
प्रतिकात्मक स्वरूपाच्या ह्या अनोख्या आंदोलनात मोदींचा मुखवटा असलेल्या व्यक्तीकडून विविध फसव्या घोषणांचे फुगे फुगवत असल्याचे तसेच त्याच्या मागे अदानी, अंबानी,बिर्ला,टाटा ह्यांची नावे धारण केलेले युवक उभे असतांना व आंबेडकरी तरुण हे अच्छे दिन चा व केंद्राच्या आश्वासनांचे फुगे फोडत असल्याचे सजीव देखावा साकारून देशाला अधोगतीला घेऊन जाणाऱ्या,केंद्राच्या उद्योगपती धार्जिन्या धोरणाचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.
ह्यावेळी केंद्राच्या अच्छेदिन,सबका साथ सबका विकास,स्मार्ट सिटी,प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणार,प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार निर्मिती करणार,स्वछ भारत अभियान,आत्मनिर्भर भारत,घसरलेला gdp ,शेतीमालाला हमी भाव देण्याची घोषणा,शेतकरी कर्जमाफी,सरकारी शाळांचा घसरलेला स्थर,ठप्प झालेली जनधन-मुद्रा योजना,१ रँक १ पेन्शन योजना,भारताची अर्थव्यवस्था 3 ट्रेलियन डॉलर पर्यंत वाढविण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा,स्विस बँकेतील काळेधन परत आणणार ,ग्राम सडक योजना,स्वस्त दरात इंधन देण्याची घोषणा,स्वस्त दरात वीज,अल्पभूधारक-कोरडवाहू शेतकऱ्यांची कर्जमाफी, ह्या सर्व घोषणा आता हवेत विरून गेल्याने प्रत्येक योजनेचे नाव घेत अच्छेदिन च्या नावे फुगविलेले फुगे फोडण्यात आले.
देशाला अच्छे दिन चे स्वप्न दाखवून उद्योगपतींना देश विकला जात असल्याचा निषेध करण्यात आला.सर्व बँक,रेल्वे,विमानसेवा,विमा कंपनी उद्योगपतींना विकण्यात आल्या आल्या,आरक्षण संपविण्यासाठी सर्वच क्षेत्रात होत असलेले खाजगीकरण,देशात मोठी बेरोजगारी असताना नौकर भरती बंद आहे,धार्मिक तेढ निर्माण केला जात आहे,शेतकरी आत्महत्या,बंद करण्यात येणाऱ्या सरकारी शाळा,ढासळलेली शिक्षण व्यवस्था,धार्मिक तेढ निर्माण करत होत असलेली झुंडशाही,ढासळलेली आरोग्य व्यवस्था ह्या सर्वच बाबतीत सरकारचे मोठे अपयश असल्याने ह्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,ऍड. अतुल कांबळे,शाहीर चरण जाधव,अशोक मगरे,शैलेंद्र म्हस्के,महेंद्र तांबे,अविनाश कांबळे,सागर प्रधान,स्वप्नील गायकवाड,विशाल इंगोले,सुबोध जोगदंड,अविनाश डोंगरे,प्रवीण हिवराळे,सतीश शिंदे,दिनेश गावळे,दीपक जाधव,सचिन जगधने,विशाल धापसे,दिनेश नवगिरे,दिलीप तडवी,कपिल बनकर,विशाल रगडे,राहुल खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
No comments:
Post a Comment