नांदेड लोकसभा पराभवामागे काँग्रेस मधून भाजपात आलेल्या नेत्यांनी केली गद्दारी – स. दिलीपसिंघ सोडी यांचा गंभीर आरोप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 12 January 2026

नांदेड लोकसभा पराभवामागे काँग्रेस मधून भाजपात आलेल्या नेत्यांनी केली गद्दारी – स. दिलीपसिंघ सोडी यांचा गंभीर आरोप

 नांदेड लोकसभा पराभवामागे काँग्रेस मधून भाजपात आलेल्या नेत्यांनी केली गद्दारी – स. दिलीपसिंघ सोडी यांचा गंभीर आरोप 



  नांदेड  - लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर व डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा झालेला पराभव हा विरोधकांमुळे नव्हे, तर नांदेडमधीलच  स्थानिक काँग्रेस मधून भाजपात आलेल्या नेत्यांमुळे झाल्याचा गंभीर आरोप स. दिलीपसिंघ सोडी यांनी केला आहे.

 प्रताप पाटील चिखलीकर व डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा पराभव घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग अमरनाथ राजुरकर व इतर काही नेते मंडळींचा होता, असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. हा पराभव म्हणजे केवळ निवडणुकीतील अपयश नसून, तो भाजपातील अंतर्गत गटबाजी व गद्दारीचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. 

ज्यांनी भाजपाचा लोकसभा उमेदवार  दोन वेळा पाडला. त्यांच्या वर अद्याप कारवाई नाही.त्याउलट   तेच  आज मनपा निवडणुकीत भाजपाला लाखो रुपये  देऊन उमेदवारी मिळवलेली आहे. 

  नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांत भाजपाची जाणीवपूर्वक कोंडी केली.

नांदेड जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाची ताकद असतानाही, बिलोलीसारख्या ठिकाणी भाजपाचे अधिकृत उमेदवार देण्यात आले नाहीत. त्याऐवजी भाजपाला विरोध दर्शविण्याचा बनाव करत (म.ज.पा.) मराठवाडा जनता पार्टीच्या माध्यमातून, भाजपाचाच पिट्टू असलेला संतोष कुलकर्णी याला नगराध्यक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, असा आरोप स. सोडी यांनी केला आहे.

भाजपाची स्पष्ट ताकद असतानाही जाणीवपूर्वक उमेदवार न देता, पक्षाला कमजोर करण्याचा डाव आखण्यात आला. ही कृती म्हणजे भाजपाशी उघडपणे गद्दारी केल्यासारखीच आहे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages