जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 12 January 2026

जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई

३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त



नांदेड, दि. १२ जानेवारी : लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धडक कारवाई करत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


रविवार ११ जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील मौजे येळी येथे नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी रात्री सुमारे १०.३० वाजता प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


या वेळी नदीपात्रात अवैध उत्खनन सुरू असताना ३ हायवा ट्रक, ७ जेसीबी, १ मोठी फायबर बोट व ४ तराफे आढळून आले. तत्काळ स्थानिक पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना घटनास्थळी बोलावून अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत ४५ ब्रास वाळूचा साठा देखील जप्त करण्यात आला असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ कोटी ३२ लाख रुपये इतकी आहे.


जप्त केलेला सर्व मुद्देमाल तहसील कार्यालय, लोहा येथे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यावर दंडात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.


या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीवर निश्चितच आळा बसण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.


No comments:

Post a Comment

Pages