डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त गौतम गजभारे ढाकणीकर यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 7 September 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त गौतम गजभारे ढाकणीकर यांचे निधन



नवीन नांदेड.(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'समाज'भुषण पुरस्कार प्राप्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम झरीबा गजभारे (वय- ५४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ७ सप्टेंबर रोजी दुपारी विष्णूपुरी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान, निधन झाले.
दिवंगत गौतमदादा गजभारे ढाकणीकर यांच्या पार्थिव देहावर सोमवारी सायंकाळी नांदेडच्या 'सिडको' परिसरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिवंगत गौतम गजभारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून, त्यांनी नांदेडच्या सिडको-हडको परिसरात बौद्ध-मातंग बहुजन समितीच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांना एकत्रीत आणण्यासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अथक परिश्रम घेतले.
याशिवाय, त्यांनी नांदेड, लोहा, कंधार व मुदखेड तालुक्यांसह नांदेडच्या सिडको-हडको परिसरात आणि विशेषतः ग्रामीण भागातील अनेक गावात सामाजिक कार्य केले.

No comments:

Post a Comment

Pages