किनवट मॉर्निंग वॉक समूहाकडून खरबी अभयारण्य परिसरात स्वच्छता करण्यात आली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 6 September 2020

किनवट मॉर्निंग वॉक समूहाकडून खरबी अभयारण्य परिसरात स्वच्छता करण्यात आली


विशेष प्रतिनीधी : किनवट / खरबी
केल्याने होत आहे रे आधी केले पाहीजे...!

        किनवट शहरापासून हाकेच्या अंतरावर पैनगंगा अभयारण्य खरबी स्थित निसर्गाचा अनमोल ठेवा मानव निर्मित कचर्‍यामुळे धोकादायक बनला असुन किनवट मॉर्निंग वॉक समूहाने दि. 06 रोजी सकाळी जवळपास 50 किलो कचरा उचलून परिसर साफ केल्याने या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

पैनगंगा अभयारण्य हा निसर्गाने नटलेला नयनरम्य परिसरा असुन येथील कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर निरोगी व शुद्ध हवा तल नागरीकांसाठी वरदान ठरत आहे. परंतु खरबी परिसर तळीरामांसाठी आवडीचे ठिकाण बनले असुन दारूचा बाटल्या, चिप्से कवर, प्लस्टिक पिशव्या अस्ताव्यस्त फेकल्यने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथे फिरणाऱ्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तर फेकलेल्या पदार्थाकडे आकर्षित होऊन चिप्से कवर, प्लस्टिक पिशव्या खाल्यास वन्यप्राण्याचे जिव धोक्यात येणार आहे. तेव्हा या गंभीर बाबीची दखल घेत स्वखर्चाने साहीत्य आणुन  हा परिसर स्वच्छ करण्याच प्रयत्न करीत 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे' या उक्तीची प्रचिती किनवट मॉर्निंग वॉक समुहाने दिली आहे. या वेळी डॉ.सुंकरवार, न.प. माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, संजय नेम्मानिवार, संजय मेहता, चेतन पंड्या, न.प. स्वच्छता दुत बाळकृष्ण कदम, बंडू कंचर्लावार, राजू ठोंबरे, राजेंद्र भातनासे यांनी परिश्रम घेतले असुन या परिसरात फक्त कचरा न करण्याचे सहकार्य करा असे आवाहन समुहाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages