ऑनलाईन शिक्षण बंद करा आणि प्राध्यापक भरती केंद्रीय पध्दतीने त्वरीत करा - नसोसवायएफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 18 September 2020

ऑनलाईन शिक्षण बंद करा आणि प्राध्यापक भरती केंद्रीय पध्दतीने त्वरीत करा - नसोसवायएफ


  नांदेड ,प्रतिनिधी:     कोरोना कोविड-19 च्या  पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आँनलाईन शिक्षणामुळे होत आहे,
सरकारचा ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सध्याच्या परिस्थितीत योग्य असला, तरी ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. केवळ गरज म्हणून शिक्षणासाठी महागड्या किंमतीच्या स्मार्ट मोबाईल खरेदी करणे गरीब विद्यार्थ्यांना शक्यच नाही, कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान तसेच शासनाच्या लॉकडाऊन वाढविल्यामुळे अगोदरच अनेकांचा रोजगार हिरावला गेला, मग अशा अडचणीत उदरनिर्वाहासाठीच कसरत करावी लागत आहे, ऑनलाइन शिक्षण प्रणाली मुळे मात्र गरीब दलित आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणप्रणाली पासून वंचित राहण्याची वेळ आली असून विद्यार्थ्यांची कुंचबना होत आहे. तसेच मराठवाड्यातील या परिसरात शेतकरी, शेतमजूर अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या पाल्यांना ६-७ हजार रुपये किमतीचा स्मार्ट फोन खरेदी करुन देणे शक्य होणारच नाही. या ऑनलाइन शिक्षणप्रणालीमध्ये ग्रामीण भागातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थी माघारल्या शिवाय राहणार नाही.
  तंत्रज्ञानाच्या युगात व कोरोना संकटाशी लढण्यासाठी घेतलेला हा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपक्रम योग्य जरी वाटत असला तरी मात्र सद्य परिस्थितीचा विचार करता टाळेबंदीमुळे गरिबांच्या हाताला काम नाही,आर्थिक चक्र पूर्णपणे थांबलेले असून त्यामुळे अनेक कुटुंबे वीज बील भरू न शकल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
ग्रामीण दुर्गम भागात राज्यातील हजारो गाव-खेड्यात आजही मोबाईलचे नेटवर्क, इंटरनेटची सुविधा नाही, अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड फोन यासारखी आधुनिक साधने कुठून येणार?
ऑनलाईन शिक्षण प्रणाली हा एक  तंत्रज्ञानाचा भाग असून नेटवर्क आणि इंटरनेटशी संबंधित आहे. याबाबत महाराष्ट्रातील विशेष करुन ग्रामीण आणि दुर्गम भागातील सद्यस्थिती राज्य सरकारने अभ्यासणे आवश्यक आहे. त्यामुळे आँनलाईन शिक्षण पध्दती बंद करावे, कारण ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही मूलभूत गोष्टींची पूर्तता नाही.
तसेच महोदय मागच्या सहा वर्षापासून राज्यामध्ये नविन प्राध्यापकाच्या भर्ती करण्यात आली नाही तसेच अनुसूचित जाती,जमाती च्या रिक्त प्राध्यापकांच्या  जागा मोठ्या प्रमाणात बाकी आहेत.मागच्या सहा वर्षात नेट,सेट,पि.एचडी उत्तीर्ण होऊन ही बेरोजगार आहेत, तसेच योग्य संख्येत प्राध्यापक नसल्याकारणा मुले विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुर्ण करणे कठीण झाले आहे.
  याच अनुशंगाने नसोसवायएफच्या वतिने मागण्यांचे निवेदन उच्च तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना दिले आहे.
मागण्या:-
१) आँनलाइन शिक्षण पध्दती बंद करण्यात यावी.
२)  रिक्त प्राध्यापकांच्या जागा केंद्रीय पध्दतीने भरण्यात याव्यात.
 ३)  SC,ST,OBC प्राध्यापकाच्या रिक्त जागा 100%भरण्यात यावे.
४)  एम.फिल,पि.एचडी च्या विद्यार्थीना फिलोशिप सूरु करण्यात यावी.
५) प्रत्येक विद्यार्थ्याला लॅपटॉप,टॅब किंवा स्मार्ट फोन द्यावा, तसेच त्यासाठी इंटरनेटचा पुरेसा डेटा मोफत उपलब्ध करावा
६) प्रत्येक गाव-खेड्यात मोबाईल नेटवर्कची व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करण्यात यावी.
   वरी मागण्या या विद्यार्थी हिताय असून आपन लवकरच या पुर्ण कराल हि अपेक्षा.
             ह्या संदर्भातील निवदन
प्रा सतिश वागरे (राज्य प्रवक्ता)
प्रकाश दिपके(मराठवाडा संघटक)
संदिप जोंधळे (जिल्हाउपाध्यक्ष)
अक्षय कांबळे कंधारकर(विद्यापीठ प्रतिनिधी)
सुजय पाटील(महाविद्यालय प्रतिनिधी)
शुभम दिग्रसकर(सोशल मिडियाध्यक्ष) यांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment

Pages