धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुविधा, सुव्यवस्था आणि सुरक्षितते संदर्भात नागपुर जिल्हाधिकाऱ्यांना आंबेडकरी संघटनांचे निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 4 September 2025

धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुविधा, सुव्यवस्था आणि सुरक्षितते संदर्भात नागपुर जिल्हाधिकाऱ्यांना आंबेडकरी संघटनांचे निवेदन


नागपुर :

धम्मचक्र प्रवर्तन दिनी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुविधा, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा गांभीर्याने विचार करणे  संदर्भात आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.


सद्या स्थितीचा आढावा घेतला असता दरवर्षी मनपा प्रशासन १००० - १०५० तात्पुरते शौचालय व स्नानगृहे उभारते. दिक्षाभूमी परिसरात  १००, माता कचेरी परिसरात ३५०, आयटीआय परिसरात २५०, जेल परिसरात ३०० शौचालय व स्नानगृहे  असतात. ही सुविधा दरवर्षी कमीच पडते. तरीही, ह्यावेळी या संख्येत भर न घालता, उलट घट होणार आहे. जेल परिसरातील भिंत तसेच आयटीआय परिसरात काम सुरू असल्याने शौचालय व स्नानगृहाबाबत गैरसोय निर्माण  होणार आहे.  


दरवर्षी दिक्षाभूमी परिसरात गर्दीमुळे जागा कमी पडते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातील शौचालये व स्नानगृहांची संख्या ह्यावेळी किमान  1500 ते 2000  इतकी असणे अत्यावश्यक आहे. मात्र, त्यासाठी  पर्यायी जागांच्या पूर्वतयारीबाबत प्रशासनाने कोणतीही सूचना किंवा निर्देश जाहीर  केलेले नाही. अद्यापही सदर विषयावर प्रशासनाद्वारे nएकही आढावा बैठक घेण्यात आली नाही. 


सदर बाब हि अत्यंत गंभीर असून मा. जिल्हाधिकारी  यांनी तातडीने मा. मुख्यमंत्री, आयुक्त व  इतर संबंधित संस्थांची एक संयुक्त बैठक बोलावून  जेल परिसर  तसेच  आयटीआय मधील असलेले  शौचालये व स्नानगृहे  उभारणीचे नियोजन तात्काळ करणे तसेच पावसाळा लक्षात घेता दीक्षाभूमी परिसरात चिखल होऊ नये म्हणून त्याठिकाणी आतापासून बोल्डर चुरी  टाकणे व दीक्षाभूमी परिसरातील शासकीय  व निमशासकीय इमारती  व  शाळा  खुल्या करून अनुयायांना  निवारा तसेच दीक्षाभूमी परिसरातील कृषि विभाग, रामदासपेठ, लक्ष्मी नगर  याठीकाणी असलेल्या मैदानात टेंट  बांधून राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यासंदर्भात  मानव अधिकार संरक्षण मंच, फ्रेंड्स मानव कल्याण संस्था, प्रियदर्शी सम्राट अशोक संस्था, एनएनबीवाय, ब्लु कॅनवस फाउंडेशन, इंदोरा मॉडेल टाऊन मित्र मंडळ, उरुवेला कॉलोनी बुद्ध विहार समिती* द्वारे मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले..


निवेदन देतांना प्रामुख्याने आशिष फुलझेले, विक्रांत गजभिये, जितु बन्सोड, शालिनी दुबे, राज रक्षित, धर्मपाल आवळे, अनिकेत कुत्तरमारे, विशाल मानकर, पियुष मेश्राम, कवीश सिसले,  सौरभ जामगडे, निषाद इंदूरकर, गौरव सहारे, वैभव बोरकर, अधिकांश हिरेखन, रोहित गणेर, मनीष साळवे, आशिष निसवाडे, राहुल मेश्राम, अंकित थुल, संघशील व धम्मशील भिवगडे, सचिन रामटेके आणि इतर उपस्थित होते..



No comments:

Post a Comment

Pages