किनवट :
शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख तथा लोकनेते माननीय ज्योतिबा दादा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील 24 वर्षापासून अखंडपणे अंजनखेड येथे भव्य अशा महारक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने आजपर्यंत शिवसेनिकांनी रक्तदान केले असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केशव कऱ्हाळे यांनी मोहपुर सर्कल मधून ज्योतिबा दादा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा संकल्प करत केला आहे. अशी माहिती शिवसेना मोहपूर सर्कलचे (उ. बा. ठा.) प्रमुख केशव कऱ्हाळे यांनी दिली आहे. केशव कऱ्हाळे यांनी गणातील प्रत्येक गावात जात परिसरातील सरपंच,पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तथा ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या घरी जाऊन रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगात रक्तदात्यांना प्रोत्साहित करत असून या अनुषंगाने रक्तदान शिबिरासाठी काढण्यात आलेल्या वाढदिवसाच्या निमंत्रण पत्रिका, रक्तदान साठी प्रोत्साहन देण्यात येणारे बॅनर घरोघरी पोहोचवत आहे.
No comments:
Post a Comment