आज आकाशात असेल ‘ब्लड मून’ : पूर्ण भारतातून दिसणारं खग्रास चंद्रग्रहण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 6 September 2025

आज आकाशात असेल ‘ब्लड मून’ : पूर्ण भारतातून दिसणारं खग्रास चंद्रग्रहण



पुणे :-  यंदाच्या वर्षातील एक दुर्मीळ खगोलीय घटना अनुभवता येणार आहे. रविवारी खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून, खगोलप्रेमींना ‘ब्लड मून’ अर्थात लाल रंगाचा चंद्र पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हे ग्रहण ५ तास २७ मिनिटे असणार असून, रात्री ९:२७ पासून ते मध्यरात्री १२:२२ वाजेपर्यंत हे दृश्य पाहता येईल.


पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वातावरणामुळे काही प्रकाशकिरण वक्रीभवन होऊन चंद्रापर्यंत पोचतात त्यामुळे चंद्रग्रहणात चंद्र पूर्ण अंधारात गेलेला दिसत नाही. या किरणात लाल रंगाच्या प्रकाश लहरींचं प्रमाण जास्त असल्याने चंद्र लालसर रंगाचा दिसतो.


       यावर्षी भारतातून फारसे ग्रहण दिसले नव्हते, त्यामुळे हे खग्रास चंद्रग्रहण पाहण्याची उत्सुकता अधिक आहे. याच दरम्यान चंद्र पूर्णपणे लाल रंगाचा दिसेल, म्हणूनच त्याला ‘ब्लड मून’ किंवा ‘रेड मून’ असे म्हटले जाते. ही खग्रास स्थिती तब्बल २ तास ७ मिनिटे टिकेल. आकाशात ढग नसतील, तर हे सुंदर खगोलीय दृश्य अगदी स्पष्टपणे पाहता येणार आहे.


चंद्रग्रहणासारख्या अवकाशात घडणाऱ्या घटना अविस्मरणीय असतात आणि आपलं अवकाशाबद्दलचं ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. चंद्रग्रहण पहाण्यासाठी कोणत्याही फिल्टरची किंवा विशेष उपकरणाची गरज नाही. मात्र दुर्बिणीतून ते अधिक स्पष्ट आणि सुंदर दिसेल.


No comments:

Post a Comment

Pages